Share

गडकरींनी केली नव्या मार्गाची घोषणा, पुणे-औरंगाबादमधील अंतर फक्त दोन तासात कापणार 

Nitin-Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्त्यांबाबत वेगवेगळे निर्णय घेताना दिसून येतात. तसेच ते मोठमोठ्या घोषणाही करतात. आता त्यांनी पुणे ते औरंगाबाद मार्गाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुणे ते औरंगाबादचे अंतर दोन तासांत कापता येईल, असे म्हटले आहे.

येत्या वर्षभरात मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे पुर्ण होणार आहे. त्यानंतर पुणे-औरंगाबाद प्रवासही जलद सुरु होईल. या हायवेमुळे पुणे ते औरंगाबादचे अंतर २ तासांमध्ये कापले जाणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

सातारा-सांगली जिल्ह्यातील २३०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. तो कार्यक्रम नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला आहे. त्यावेळी त्यांनी पुणे-औरंगाबाद महारामार्गाबाबत भाष्य केलं आहे.

साताऱ्यात उंडवडी कठेपठार ते फलटण या ३३.६५ किमी लांबीच्या चौपदीकरणाची पायाभरणी तर सांगलीत गडकरींनी सांगली ते पेठ  नाका या ४० किमी लांबीच्या चौपदरीकरणाची भूमिपूजन केले. त्यावेळी त्यांनी पुणे-औरंगाबादच्या महामार्गाबद्दल सांगितले आहे.

मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेचे काम सुरु आहे. त्यानंतर औरंगाबाद-पुणे महामार्गाचे काम सुरु केले जाणार आहे. या मार्गामुळे पुण्यावरुन औरंगाबादला फक्त २ तासांत पोहचता येणं शक्य होणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

तसेच पुणे-औरंगाबाद एक्सप्रेसवे मार्ग हा पाथर्डीसह अन्य तालुक्यात हा मार्ग जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा तिथल्या लोकांनाही होईल, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सध्याचं पाहिलं असता पुणे-औरंगाबामध्ये २३५ किमीचे अंतर आहे. त्यामुळे जाण्यासाठी जवळपास ५ तास लागतात. पण पुणे-औरंगाबाद महामार्ग बनल्यानंतर हे अंतर फक्त २ तासांत कापले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील कोस्टल रोडला लता दीदींचे नाव द्या; मंगेशकर कुटुंबियांची सरकारकडे मागणी
अदानींसाठी आता सेहवाग मैदानात; हिंडेनबर्गची चिरफाड करत म्हणाला, गोऱ्या लोकांना भारताची…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंनी कपाळाला टिळा लावण्यास दिला नकार; व्हायरल VIDEO वरून वाद

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now