Nitin Deshmukh : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत मिळून सत्ताही स्थापन केली. तेव्हापासून राज्याच्या राजकारणामध्ये सतत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडून त्यांच्यात सतत खटके उडत आहेत.
शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी नितीन देशमुख हे ठाकरे गटाकडे परतले आहेत. आता नितीन ठाकरे यांनी राज्यातील सत्तांतरावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील सत्तांतर पैशाच्या मदतीने झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते अकोला येथे एका सभेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात पैशाच्या मदतीने सत्तांतर झाले आहे, हे मी सिद्ध करून दाखवेल. जर मी हे सिद्ध करू शकलो नाही तर, महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असे त्यांनी सांगितले आहे.
यासोबतच गेल्या दीड वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही नितीन देशमुख यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझ्यावर अँटी करप्शनची चौकशी लावण्यात आली. त्यापेक्षा माझ्यावर ईडीची कारवाई लावा. ईडीची कारवाई लावल्यास माझे समाजात नाव तरी वाढेल, असेही ते म्हणाले.
तसेच यापुढे जर पुन्हा माझ्याविरुद्ध चुकीची कारवाई केली तर, मी माझ्याकडे असलेल्या व्हिडीओ क्लिप्स बाहेर काढेन, असेही ते म्हणाले आहेत. माझ्याकडे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांच्या आवाजाच्या क्लिप्स असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्यातील सत्तांतर हे पैशाच्या जोरावर झाले असल्याचे मी सिद्ध करू शकलो नाही, तर विधानसभेत आत्महत्या करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. आता नितीन देशमुखांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Shivsena : दसरा मेळाव्यावरून आक्रमक शिवसेना थेट शिवाजी पार्कमध्ये घुसणार; सरकारला फुटला घाम
Sanjay rathod : राठोडांना आसमान दाखवण्यासाठी शिवसेनेने खेळला मोठा डाव; पोहरादेवीच्या महंतानाच उतरवणार रिंगणात
Shinde group : एकनाथ शिंदेंचा आता भाजपलाच दे धक्का; तब्बल १०० भाजप पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
Crime : पोलिसांनी डॉक्टरची गाडी थांबवली, तपासात असे काही सापडले की डॉक्टरची रवाणगी थेट तुरुंगात