राणे घराणे नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात. आता आमदार नितेश राणे यांनी मध्यंतरी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. जे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. आता नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे यांनी रोहित पवार यांची तुलना अॅमेझॉनशी केली आहे. रोहित पवार केंद्र सरकारवर नेहमी ट्विट करून टीका करत असतात. त्यांच्या याच टीकेवर आता नितेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटला विरोधकांनी विरोध करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नितेश पवार यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, अमेझॉनकडे अॅलेक्सा आहे, आणि महाराष्ट्राकडे रोहित पवार आहेत. दोघांनाही सगळं माहीत आहे. फक्त अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते पण रोहित पवारांना नाही, असे ट्विट करत नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अगोदर अयोद्धेत जाऊन आले. हा दौरा भाजप नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. या यात्रेतून रोहित पवारांनी सर्वधर्मीय तीर्थस्थळांना भेटी दिल्या. रोहित पवार यांनी विविध स्थळांना दिलेल्या भेटी, ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकल्या. यावरूनच नितेश राणे यांनी रोहित पवार यांची तुलना अँलेक्साशी केली असल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1524619157027037184?t=CGRmmY2MdGVSNQri7xouMA&s=19
मध्यंतरी भोंग्याचे प्रकरण प्रचंड गाजले होते. भाजपने देखील राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला साथ दिली. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. ‘मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी आग पेटवली आहे’ असे म्हणत भाजपवर टीका केली होती.
तसेच त्यांनी ट्विट करून लिहिले होते की, मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळे बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरून एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधे यांसाठी हातात हात घालून लढत होतो. त्यामुळे माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावले, पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.
रोहित पवार हे राज्य व देशातील घटनांवर नेहमी आपले विचार सोशल मीडियावर मांडतात. ते दिवसभर करत असलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती सोशल मीडियावर टाकतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणी टीका केली तर त्याला देखील प्रतिउत्तर देत असतात.