Share

एका बाईने राणेंना पाडलं म्हणताच नितेश राणे संतापले, थेट अजितदादांची दुखरी नसच दाबली; म्हणाले..

मुंबई : शिवसेना पक्ष फोडणाऱ्या सर्वांचा जनतेने पुढील निवडणुकीत पराभव केला. नारायण राणे दोनदा पडले. एकदा ते कोकणात हरले.  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतेच वांद्रे विधानसभा मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडल्याचे वक्तव्य केले.

शहरातील प्रचार सभेत अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खिल्ली उडवली आणि शिवसेनेत फूट पाडणारे नेते कधीच यशस्वी होत नाहीत असे म्हटले. या टीकेला नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.

अजितदादांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांच्या वेदनादायक जखमेवर बोट ठेवले आहे. मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवलेले पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. हाच धागा काढत नितेश राणे यांनी अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिले.

यावेळी तरी माझा मित्र पार्थला निवडूण आणा. मागच्या वेळी एका सामान्य शिवसैनिकाने बिचाऱ्याला पाडले होते. येत्या निवडणुकीत काही होते का ते बघा. नारायण राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. पण तुम्ही भावी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अडकताय असं दिसतंय, असा टोला नितेश राणेंनी अजित पवारांना लगावला.

नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडणारे सर्व आमदार पडल्याचा दावाही नितेश राणे यांनी फेटाळून लावला. अजितदादा मोठे नेते आहेत. पण तुम्ही ते वाचल्याशिवाय पाहू शकत नाही.

राष्ट्रवादीच्या पटकथा लेखकाने त्यांच्यासाठी योग्य माहिती लिहावी. शाम सावंत वगळता राणेसाहेबांसह शिवसेना सोडलेले सर्व आमदार पुन्हा निवडून आले. असं नितेश राणेंनीही आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही उदाहरणे देत अजित पवार म्हणाले होते की, शिवसेनेपासून वेगळे झालेले लोक राजकारणात यशस्वी होत नाहीत. छगन भुजबळ यांनी १९ जणांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर भुजबळांसह सर्वांचा पराभव झाला.

नारायण राणेंनी शिवसेना फोडली त्यांच्यासोबत पक्ष सोडून गेलेले सर्व आमदार पडले. नारायण राणे स्वतः दोनदा पडले. एकदा कोकणात उभा राहिले, दुसऱ्यांदा मुंबईत वांद्रे, तिथेही पडले. तिकडे एका बाईने त्यांना पाडले. अशी घणाघाती टिका नारायण राणेंवर अजित पवारांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या
माझी लाडकी बाहुली, आदिती म्हणत धर्मेंद्र यांनी शेअर केला गुटगुटीत मुलीचा फोटो, कोण आहे ती?
महाराष्ट्रातील सर्वात मोठी फॅमिली! एका वेळेला लागतो १५०० चा भाजीपाला, २० लिटर दूध
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now