Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संतापजनक शब्दांत टीका केली आहे.
काय म्हणाले निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे यांनी एका व्हिडिओत म्हटलं की, “हिंदी भाषिकांवर हल्ला करायचा सोपा आहे, पण हिंमत असेल तर उर्दू भाषिकांवर हल्ला करून दाखवा. तुमच्यात दम असेल तर माहीम (Mahim – Mumbai) येथील दर्ग्यावर जाऊन हे करून दाखवा.” त्यांनी याही पुढे जात ठाकरे बंधूंना उद्देशून म्हटलं की, “जर तुम्ही खरे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार असाल, तर ही हिम्मत दाखवा.”
मराठी समाजावरही साधला निशाणा
दुबे यांनी मराठी जनतेवरही अत्यंत वादग्रस्त आणि अपमानजनक विधानं केली. “मराठी लोक आमच्या पैशांवर जगतात. तुमच्याकडे उद्योग नाहीत, तुम्ही किती टॅक्स देता हे सांगा. आमच्याकडे खाणी (Mines) आहेत. सगळे उद्योग (Industries) गुजरातला जात आहेत,” असं म्हणत त्यांनी मराठी समाजालाही डिवचलं.
बाहेर या, आपटून आपटून मारू!
दुबे यांच्या वक्तव्याचा सर्वात तीव्र भाग म्हणजे त्यांनी थेट धमकी दिली की, “तुम्ही महाराष्ट्राबाहेर या – बिहार (Bihar), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये जा – मग कळेल, आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू.”
दहशतवाद्यांशी तुलना
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दुबे यांनी त्यांची तुलना थेट सलाऊद्दीन (Salahuddin – Terrorist), मसूद अजहर, आणि दाऊद इब्राहिम यांच्यासोबत केली. “दहशतवाद्यांनी काश्मिरी हिंदूंवर अत्याचार केला, आणि आज तुम्ही हिंदी भाषिकांवर तेच करत आहात,” असं आरोप त्यांनी केला.
कोण आहेत निशिकांत दुबे?
निशिकांत दुबे यांचा जन्म भागलपूर (Bhagalpur – Bihar) येथे २८ जानेवारी १९६९ रोजी झाला. ते झारखंडमधील गोड्डा (Godda – Jharkhand) लोकसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपमधील आक्रमक, स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत.