Share

‘पुण्यात जास्त पाऊस नाही, दिवाळीची सफाई सुरु आहे’, तुंबलय पुणे पण ट्रोल होताहेत निर्मला सीतारमण

nirmala sitaraman

nirmala sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी राज्यात विशेष लक्ष्य घातले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी देखील दुसरीकडे बाब म्हणजे, त्यांची अनेक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आपण पाहिली आहेत.

निर्मला सीतारमण यांची अनेक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच त्यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. एका वाक्यामुळे निर्मला सीतारमण प्रचंड ट्रोल होत आहेत. सोशल मिडियावर तर मीम्सचा पाऊस पडत आहे.

https://twitter.com/drsangrampatil/status/1581906539450757120?s=20&t=gswnipVLtTlsj4_PCD9LAw

अलीकडे आपल्या देशात महागाईने हाहाकार केला आहे. तर दुसरीकडे बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळतं आहे. तसेच अलीकडे रुपयाचं बाजार मुल्य डॉलर्सच्या तुलनेत कमी होत चाललं आहे. याचा परिमाण थेट सर्वसामान्य नागरिकांवर होताना पाहायला मिळत आहे.

 

याचाच धागा पकडत निर्मला सीतारमण यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. मात्र त्या म्हणाल्या, रुपया कमजोर झालेला नाही, उलट डॉलर शक्तिशाली होत चालला आहे. सध्या या उत्तरामुळे निर्मला सीतारमण यांना जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. सर्वत्र यांच्याच वक्तव्याची चर्चा आहे.

https://twitter.com/OfficeOfPunekar/status/1582066263899406341?s=20&t=lTg-EG4mJLvKdGrMonQg2Q

 

दरम्यान, सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. “मोदीजी कुछ बेच नहीं रहे हैं, दूसरे लोग खरीद रहे हैं”, पाऊस जास्त नाहीये..इमारतीची साफसफाई सुरुये..!,’ अशा प्रकारचे सोशल मिडियावर मीम्स पाहायला मिळत आहे. यासोबत व्हिडिओ, फोटो देखील शेअर केले आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now