राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जहरी शाब्दिक निशाणा साधला आहे. यामुळे आता आणखी नव्या वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे.
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ओवैसी नावाचे दोन हलकट जोपर्यंत ह्या देशात आहेत तोपर्यंत ते हिंदुना डिवचत राहणार. या दोघांना उघडे नागडे फेकले पाहिजे, त्या औरंगजेबच्या ठिकाणी राज्य सरकारने शौचालय उभारून तुम्ही कोणाची अवलाद आहात हे दाखवून द्या.’
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1525085689406275587?s=20&t=qNY2rnbYvlUV8Y-0fmbjpw
तर दुसरीकडे निलेश राणे यांचे बंधु नितेश राणे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला. ‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही,’ असं त्यांनी म्हंटलं आहे.
ट्विट करत नितेश राणे म्हणतात, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” असं ट्वीट करत त्यांनी गर्भित इशारा केला आहे. सध्या राणे यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये राणेंनी म्हंटलं आहे की, “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवरही टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
बारामतीच्या गांधीसाठी नथूराम…’; शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाला भोवलं
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
‘भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो’, बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर