एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भाजपशी जवळीक वाढताना दिसून येत आहे. असे असतानाच आता भाजप आणि शिंदे गटात वाद सुरु होताना दिसून येत आहे. (nilesh rane angry on deepak kesarkar)
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते असल्याने ते शिंदे गटाची भूमिका मांडत असतात. अशातच त्यांनी राणे पुत्रांवर टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. आता याला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. सध्या त्यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
निलेश राणे हे अनेकदा ट्विट करत असतात. तसेच त्यांच्या टीका करण्याच्या पद्धतीमुळे ते चर्चेतही येत असतात. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, राणेंची मुलं लहान आहे. त्यांना समजवायचं काम फडणवीस साहेब करतील. लहान मुलं ट्विट करतात, त्यांच्या ट्विटकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यानंतर आता निलेश राणे यांनी त्यांना सुनावलं आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1547196032974352385
दीपक केसरकर २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे तुम्ही विसरु नका. उड्या कशाला मारताय. इज्ज मिळते ती घ्यायला शिका. लायकीपेक्षा जास्त बोलू नका. आपण एका युतीमध्ये आहोत. जेवढी युती टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच तुमच्यावर सुद्धा आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ शब्द आठवताच दीपक केसरकरांना अश्रु अनावर; वाचा नेमकं काय घडलं?
‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले