पुण्यात मनसेला भलेमोठे भगदाड पडल्याची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला जबर धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मनसे नेते वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याने पक्षाला रामराम ठोकला आहे.
राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते हेमंत संभुस यांनी दिली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याकडे पुणेकरांसोबतच अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र अशातच मनसेच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष आणि वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्ता अशी ओळख असलेले निलेश माझीरे मनसे सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची देखील भेट घेतली आहे.
तसेच येत्या दोन दिवसांत माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. तसेच असं झाल्यास हा मनसेसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राज यांच्या सभेपूर्वीच पुण्यात मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट सध्या राज ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील रविवारच्या सभेत आयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे काय स्पष्टीकरण देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती. अखेर राज यांनी दौरा स्थगित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“कलम ३७० रद्द झाल्यास रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा दगडही मारू शकले नाहीत”
आता अण्णा हजारेंच्या विरोधातच होणार आंदोलन; ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलनाची घोषणा
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…
५० हजारांची पुस्तके घेणाऱ्या राज ठाकरेंच्या एका फोनवर राज्यातली ग्रंथालये सुरू झाली होती; वाचा किस्सा..