कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मनोरंजन क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला होता. मात्र 2022 या वर्षात कलाविश्वाने प्रेक्षकांना अक्षरश: चित्रपटांची मेजवानी दिली आहे. एका पाठोपाठ उत्तम कथानक आणि आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. सात दिवसांत ‘झुंड’ने 10 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.
विशेष बाब म्हणजे प्रदर्शनाच्या दिवसापासूनच ‘झुंड’ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावरून टीका केली. असं असलं तरी अनेकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. तसेच पत्रकार निखील वागळे यांनी देखील या सिमेनाबाबत भाष्य केले आहे.
https://www.facebook.com/waglenikhil23/posts/519588426199898
https://www.facebook.com/waglenikhil23/posts/519588426199898
फेसबुक पोस्ट लिहीत निखील वागळे यांनी नागराज मंजुळे यांच्या चित्रपट बनवण्याच्या शैलीबाबत सखोल भाष्य केलं आहे. ‘ही फक्त एका फुटबॅाल टीमची कहाणी नाही, ही बंड करु पहाणाऱ्या बहुजन समाजाची कहाणी आहे. पुन्हा पुन्हा घ्यावा असा हा अनुभव आहे. हा १७८ मिनीटांचा दीर्घ सिनेमा तुम्हाला पकडून ठेवतो. जात-धर्मा पलिकडे तो पोहेचतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच ‘एक माणूस म्हणून मला हा सिनेमा नखशिखांत हलवून गेला. हा उद्याच्या भारताचा सिनेमा आहे असं मला वाटतं. विषमतापूर्ण समाजात जगताना संधी मिळाली की तरुण मुलं कशी सोनं करतात हे नागराज मंजुळे यांनी फार प्रभावीपणे दाखवून दिलं असल्याच वागळे यांनी पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणतात, फॅंड्री, सैराट, झुंड या तिन्ही सिनेमात एक समान सूत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरुन नागराज आपली हटके कहाणी सांगतो. फॅंड्रीमध्ये जब्याने समाजावर भिरकवलेला दगड आठवणीतून जात नाही. सैराट मधलं आंतरजातीय प्रेम आणि संघर्ष, शेवटची हिंसा तुम्हाला विचारात पाडते. झुंड तर पुढे जाऊन बंडाची सकारात्मक दिशा निश्चित करतो.’
महत्त्वाच्या बातम्या
समाज एकत्र असताना दुरावा निर्माण होईल असे चित्रपट करू नये; कश्मीर फाईल्सबद्दल पवारांचे परखड मत
ज्या जत्रेत मुस्लिम देवीची पुजा करायचे त्याच जत्रेत त्यांना दुकाने लावण्यास बंदी, हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव
काश्मिर फाईल्समधील राधिका मेननची खरी स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? JNU मध्ये आहे प्रोफेसर
मोदींच्या मुत्सद्देगिरीची कमाल! आॅस्ट्रेलियने भारताच्या २९ पुरातन वस्तू व मुर्ती दिल्या परत