Share

IND Vs NZ : ‘त्या’ एका चुकीमुळे न्युझीलंडने गमावला हातातला सामना अन् भारताने जिंकली ट्वेंटी मालिका

indian team newzeand

Newzeland this mistake and india won IND Vs NZ series  | हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका १-० ने जिंकली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना भारताने ६५ धावांनी जिंकला होता. यानंतर आज नेपियरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात एक रंजक निकाल पाहायला मिळाला.

तिसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १६० धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या २१ धावांवर संघाचे टॉप-३ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याने थोडी चांगली खेळी केली.

अशात या सामन्यात मात्र सूर्याकुमार खुप लवकर बाद झाला. दुसऱ्या सामन्यातील स्टार सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात फार काही करू शकला नाही. तो फक्त १३ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार हार्दिकने चांगली कामगिरी केली. त्याने १८ चेंडूत ३० धावा केल्या.

भारताची धावसंख्या ९ षटकात ४ विकेट गमावून ७५ धावा असताना पाऊस येण्यास सुरुवात झाली. डीएलएस नियमानुसार यावेळी दोन्ही संघांचे गुण समान होते. अखेर पावसामुळे सामना पुढे जाऊ शकला नाही आणि सामना बरोबरीत सुटला.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हा सामना टाय होण्यामागचं मुख्य कारण तेच असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर  अष्टपैलू मिचेल सँटनरचे मिसफिल्ड केली होती. त्यामुळे भारतीय संघाला १ धाव काढता आली.

सँटरने  ही चूक केली नसती तर टीम इंडियाचा स्कोर ७४/४ झाला असता आणि न्यूझीलंडने ही मालिका बरोबरीने संपवली असती. पण मिचेलने केलेल्या मिसफील्डमुळे न्युझीलंडच्या संघाला सामना गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nagaraj Manjule: याला म्हणतात खरी मैत्री! बालपणीच्या मित्रासाठी नागराज मंजुळेंनी केलं असं काही की..वाचून कराल कौतूक
हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय
हॉटेलचे ३७ वर्षे जुने बिल व्हायरल; शाही पनीर अन् दाल मखनीची किंमत वाचून हैराण व्हाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now