T-20 World Cup : आज टी-२० विश्वचषक २०२२ चा सुपर-१२ फेरीच्या ग्रुप वनमध्ये न्यूझीलंडचा सामना आयर्लंडशी होता. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. केन विल्यमसनने ३५ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याचवेळी जोशुआ लिटलने हॅटट्रिक घेतली. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १५० धावाच करू शकला.
न्यूझीलंडने आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील दावा मजबूत झाला आहे. किवी संघाचे आता पाच सामन्यांनंतर ७ गुण झाले आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी ५ गुण आहेत. इंग्लंडला आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
जर इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेचा चांगल्या फरकाने पराभव केला तर ऑस्ट्रेलियाला नेट रन रेटमध्ये इंग्लंडला पराभूत करावे लागेल. दुसऱ्या स्थानासाठी या दोन संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापले सामने गमावल्यास श्रीलंकेची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढेल.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ ग्रुप २ मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. भारतीय संघासमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ग्रुप स्टेज संपल्यावर तो कोणत्या क्रमांकावर राहतो.
भारतीय संघ जर ग्रुप स्टेजमध्ये पाहिल्या क्रमांकावर राहीला तर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासोबत सामना होऊ शकतो. जर भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला तर संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल.
महत्वाच्या बातम्या
India : पाकिस्तानने हरवलं आफ्रिकेला पण वाट लागली भारताची; वर्ल्डकपमधून भारत बाहेर?
IND vs PAK : ..तर वर्ल्डकप फायनलमध्ये होणार भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या संपुर्ण गणित
Pakistan : ‘वर्ल्कपमध्ये बड्या बड्या संघांना जे जमलं नाही, तो पराक्रम पाकिस्तानी संघाने करुन दाखवला’
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग