सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेता सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाबाबत रोज नवीन नवीन खुलासा होत आहे. आता या प्रकरणाबाबत धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमांच्या ४६ खूणा आढळून आल्या आहेत.
विशेष म्हणजे सोनाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला त्यावेळी त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एकुण तपासकार्यावर आता संशय व्यक्त केला जात आहे. या माहितीमुळे खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
म्हटलं जात आहे की, गोव्यातील डॉक्टरांनी सोनाली फोगाटची METABOLITIES TEST करण्याचा सल्ला दिला होता. पण आवश्यक साधनसामग्रीअभावी ही चाचणी होऊ शकली नव्हती. ही व्हिसेराची खूप मोठी चाचणी ठरली असती आणि या प्रकरणाशी संबंधित सत्य समोर आणण्यासाठी मोठी मदत झाली असती.
सध्या, गोवा पोलीस सुधीर सांगवानच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. सुधीर सांगवानच्या पासपोर्टचा तपास सुरू आहे. सुधीर सांगवानच्या पासपोर्टचं व्हेरिफिकेशन ज्या ठिकाणी झालं होतं, त्या ठिकाणी जाऊनही पोलीस तपास करणार आहेत.
पासपोर्टमध्ये काही गडबड आढळल्यास गोवा पोलीस सुधीर सांगवानविरोधात गुन्हा दाखल करु शकतात. दरम्यान, सोनाली फोगाटच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, सांगवानने सोनाली फोगाटला याआधीही विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता.
सांगवानचा सोनालीच्या मालमत्तेवर डोळा होता असा आरोपही त्यांनी केलाय. सोनाली यांच्या गुरुग्राम फार्महाऊसवर सुधीर सांगवानने कब्जा केला होता. तसेच सोनालीच्या गोवा दौऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा देखील कुटुंबियांनी यावेळी केला. या प्रकरणाबाबत आणखी काय माहिती समोर येईल पाहावं लागेल.