Share

ट्रॅफिकचे नवे नियम लागू; पहिल्या चुकीला 10 हजार दंड, दुसऱ्यावेळी गुन्हा तर तिसऱ्यावेळी होणार लायसन्स रद्द

शहराच्या ठिकाणी दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे, आणि या वाहतूक कोंडीचा सामना रोज करावाच लागतो. असे असताना आता दिल्ली सरकाराने या वाहतूक कोंडीवर एक तोडगा काढला आहे. दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने यासाठी दिल्लीत नवीन नियम लागू केले आहेत.

दिल्लीतील वाहनधारकांसाठी हा नियम असून काल म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून दिल्लीत हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच महागात पडणार आहे. जर तुम्ही वाहन चालवताना चूक केली तर पहिल्या चुकीला तुम्हाला 10 हजार दंड द्यावा लागेल.

तीच चूक तुम्ही दुसऱ्यांदा केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला जाईल. तसेच तिसऱ्यावेळी तुमचे लायसन्स रद्द केले जाईल, अशी या नव्या नियमात तरतूद करण्यात आली आहे. हा नियम लागू झाल्यामुळे दिल्लीतील जनता खूप खूश आहे. कारण दिल्लीत वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही विशेष व्यवस्था नव्हती.

नव्या नियमानुसार,1 एप्रिलपासून दिल्लीच्या 15 मुख्य रस्त्यांवर खाजगी, डीटीसी आणि क्लस्टर बसेससह अवजड वाहनं फक्त बस लेनमधूनच जाऊ शकतील. या नियमाचं उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय जर तुम्ही तुमची दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन बस लेनमध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला देखील 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत. हा नियम मेहरौली-बदरपूर रोडमधील अनुव्रत मार्ग टी-पॉइंट ते पुल प्रल्हादपूर टी-पॉइंटपर्यंत, मोती नगर ते द्वारका मोर, ब्रिटानिया चौक ते धौला कुआं, कश्मीरी गेट ते अप्सरा बॉर्डर, आश्रम चौक ते बदरपूर बॉर्डर, जनकपुरी ते मधुबन चौक या मार्गावर लागू झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्ली परिवहन विभागाने हे नियम लागू केले आहेत. लहान वाहनांच्या चालकाने कोणताही नियम मोडल्यास पहिल्यांदा त्यांना 5 हजारांचा दंड भरावा लागेल आणि हीच चूक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम वाढून 10 हजार किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा असा असेल. याशिवाय लायसन आणि परमीटही रद्द होऊ शकतं.

एक एप्रिलपासून हे नियम लागू झाले असून सध्या केवळ बस आणि अवजड वाहनांसाठी हा नियम असणार आहे. मात्र, पंधरा दिवसांनंतर हा नियम सर्व वाहनांसाठी लागू होणार आहे. नियमांचं काटेकोर पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची तब्बल 50 पथकं शहराच्या विविध भागात तैनात केली आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now