Share

महाशिवरात्रीला येणार अमृता फडणवीसांचं नवं गाणं, चाहत्यांची उत्सुकता शिगेला….

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कधी त्यांच्या लूकमुळे तर कधी त्यांच्या गाण्यामुळे कायम चर्चेत असतात. सध्या त्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्यांनी त्यांच्या आगामी गाण्याच्या अल्बम बद्दल केलेली घोषणा.

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी अनेक विषयांवरील त्यांची मतं व्यक्त केली. तसेच त्यांच्या नव्या गाण्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

आयोजित कार्यक्रमानंतर अमृता फडणीस यांनी पत्रकारांशी विविध विषयावर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की, महाशिवरात्रीला त्यांच्या नव्या गाण्याचा अल्बम रिलीज होणार आहे. ‘तिला जगू द्या’, ‘गणपती साँग’ आणि आता ‘शिवतांडव’ या गाण्याचा येत्या महाशिवरात्रीपर्यंत नवा अल्बम येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस यांनी दिवाळीला त्यांचे ‘ओम जय लक्ष्मी माता’ हे गीत प्रदर्शित केलं होतं. हे गीत अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायले आहे.  तसेच अमृता यांनी ‘तिला जगू द्या’ हे गाणे सोशल मीडियावर भाऊबीजेनिमित्त शेअर केले होते.

अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वी गणेश वंदना हे गीत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले गायिका योहानीचे Manike Mage Hithe हे गाणं देखील अमृता फडणवीस यांनी गायले होते. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

अमृता फडणवीस स्वत: बँकर आहेत. त्या पार्श्वगायनही करतात. फडणवीस यांचे अनेक अल्बम याआधी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चाहते कायम त्यांच्या गाण्याची वाट पाहात असतात. आता अमृता यांनी अजून एका नव्या अल्बमची घोषणा केल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now