Share

उद्धव ठाकरेंच्या जखमेवर शिंदे गट चोळणार मीठ, ‘या’ ठिकाणी उभारणार नवीन शिवसेना भवन

महाराष्ट्रातील राजकारणातला शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद शिगेला पोहोचला आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. पुढे शिंदे गटाने दिल्लीतील खासदारांना सुद्धा आपल्या बाजूने वळवले. मग निवडणूक आयोगात धनुष्यबाणावर आपला दावा सांगितला. आणि आता याही पुढचे पाऊल शिंदे गटाने टाकल्याचे वृत्त आहे. (new Shiv Sena Bhavan will be built at this place)

शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर परिसरात लवकरच शिंदे गट नवे शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवसेनेच्या नव्या शाखा स्थापन केल्या जाणार आहेत.

शिंदे गट सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना मोठे धक्केच देत आहे. त्यामध्ये आता शिवसेना भवनाच्या या नव्या चर्चेमुळे शिवसेनेला हादरा बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी नवं सेनाभवन उभारण्याबाबत माहिती दिली.

पुढे ते म्हणाले की, ‘लवकरच नव्या शाखा उभारल्या जातील. शाखाप्रमुखांची घोषणा होईल. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काम जोरदार होईल. शिंदे साहेबांचा कामाचा व्याप बघता त्यांना एका कार्यालयाची आवश्यकता आहे.’

‘त्यामुळे त्यांचे स्वतंत्र कार्यालय दादर भागात निर्माण केले जाईल. आणि त्यांच्या नेतृत्वात असणाऱ्या शाखांचे देखील कामकाज त्या ठिकाणाहून होईल, अशा स्वरूपाची माहिती सदा सरवणकर यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आक्रमक बाणा असणाऱ्या शिवसेना पक्षात उभी फूट पडली. आमदारांनी बहुमत सिद्ध करत सरकार स्थापन केले. पुढे ही लढाई कोर्टापर्यंत गेली. निवडणूक आयोगात पक्ष चिन्हावर दावा सांगितला गेला. आणि आता स्वातंत्र्य शिवसेना भवनाची निर्मिती म्हणजे फुटून वेगळं झालेल्या आमदारांचं हे अखेरचा पाऊल म्हणता येईल.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena: …तर त्यांनी शिवसेना फोडलीच नसती, राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे गटावर सडकून टीका
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलारांनाही मिळाली मोठी जबाबदारी
BJP : सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव नक्की; धक्कादायक आकडेवारी आली समोर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now