Share

संगीतकार अतुलच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, घेतली ‘ही’ ड्रीम बाईक, किंमत वाचून अवाक व्हाल

संगीत क्षेत्रातील अजय – अतुल जोडीनं आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला उत्तम आणि दर्जेदार गाणी दिली. सध्या हे दोघे ‘इंडियन आयडल -मराठी’ या शोचं परीक्षक म्हणून काम पाहताना दिसत आहेत. नुकतीच अतुलनं चाहत्यांसोबत एक आनंदाची गोष्ट शेअर केली आहे.

अतुल गोगावले यांच्या घरी एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. यामुळे त्याचं कित्येक दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अतुलनं इन्स्टाग्राम अकाउंटवर या सदस्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांचा आनंद चाहत्यांबरोबरही शेअर केला आहे. आता या नवीन पाहुण्याचे फोटो पाहून तुम्हाला देखील नक्कीच आनंद होईल.

तुम्हाला माहिती आहे का, की अतुल गोगावले याला बाईक्सची खूप आवड आहे. अनेकदा तो बाईकवरून लाँग ड्राईव्हला जात असतो. सोशल मीडियावर देखील ते अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. सध्या त्याच्याकडे बीएमडब्ल्यू बाईक आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर आहेत.

मात्र आता अतुलनं बीएमडब्ल्यूआर १२५० जीएस  ही अधिक अत्याधुनिक असणारी बाईक विकत घेतली आहे. त्याने त्याचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टग्रामवरती शेअर केले आहेत. अतुलची ही नवी कोरी बाईक पांढऱ्या आणि निळ्या रंगाची आहे.

व्हिडीओत अतुल आपल्या या नव्या पाहुण्याला हार घालताना आणि ओवाळताना दिसत आहे. तसेच गाडीपुढे नारळही वाढवताना दिसत आहेत. गाडी घेताना अतुलसोबत त्याचे घरचे सर्व सदस्य दिसत आहेत. गाडी पाहून अतुलचा चेहऱ्यावरचा आनंद देखील दिसत आहे.

या गाडीची किंमत एकूण तुम्हाला धक्का बसेल. बाईकची भारतामधील किंमत २२ लाख रुपये इतकी आहे. नेटकऱ्यांनी गाडी पाहून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अभिनंदन केलं, तर काहींनी गाडी जपून चालवा असा सल्ला दिला आहे. अतुलच्या कामाबद्दल सांगायचे तर तो प्रसिद्ध संगीतकार तर आहेच शिवाय उत्तम गायकदेखील आहे.

मनोरंजन इतर

Join WhatsApp

Join Now