सध्या जवळजवळ सगळयाच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. लोक अनेक नवनवीन फिचर्स असलेले महागडे मोबाईल घेण्यात रस दाखवतात. अशावेळी, महागड्या मोबाइलच्या सुरक्षिततेसाठी टेम्पर्ड ग्लास किंवा स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर लोक करतात. मात्र बाजारात स्वस्तात मिळत असलेला टेम्पर्ड ग्लास वापरणे योग्य आहे का याबद्दल जाणून घेऊ.
बाजारात दोन प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पहिला काच (ग्लास) आणि दुसरा प्लास्टिकचा आहे. स्क्रीन गार्ड किंवा टेम्पर्ड ग्लास युजर्स स्मार्टफोनच्या स्क्रीनला संरक्षणाचा दुसरा स्तर प्रदान करण्यासाठी वापरतात. प्लॅस्टिक रक्षकांबद्दल बोलायचे तर ते खूप मजबूत आहेत, ते अधिक काळ टिकतात.
या प्रकारचे स्क्रीन गार्ड टेम्पर्ड ग्लासपेक्षा तुमच्या फोनच्या स्क्रीनचे अधिक संरक्षण करते. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे आयुष्य काचेपेक्षा जास्त असते आणि ते दीर्घकाळ वापरता येतात. मात्र याचा तोटा म्हणजे, प्लास्टिकचे बनलेले असल्याने, त्यांना ओरखडे होण्याची शक्यता असते आणि ते त्यांची स्पष्टता फार लवकर गमावतात. काहीवेळा ते स्क्रीनला तसेच युजर्सला हानी पोहोचवते.
मात्र, टेम्पर्ड ग्लास वापरली तर त्याचे अनेक फायदे नक्कीच आहेत. आपल्याला त्यांच्यामध्ये जवळजवळ सर्व काही मिळते, जे प्लास्टिक स्क्रीन संरक्षकांमध्ये आढळत नाही. प्लास्टिक स्क्रीन प्रोटेक्टरच्या तुलनेत ते महाग आहेत. मात्र, आता बाजारात हे टेम्पर्ड ग्लास प्रचंड प्रमाणात विकताना दिसतात. तसेच त्यांची किंमत देखील कमी असते.
अशावेळी लोक बाजारातील स्वस्त मिळणारी ही टेम्पर्ड ग्लास खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. मात्र खरच ही टेम्पर्ड ग्लास तुमच्या मोबाईलची सुरक्षितता करते का? असा प्रश्न निर्माण होतो. तर आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो की, बाजारात केवळ टेम्पर्ड ग्लासच्या नावाने काचेचे तुकडे 100 रुपयांना विकले जातात. या प्रकारच्या काचेचा वापर करून, आपण स्वत: ला देखील इजा करू शकतो.
स्वस्त काचेचे संरक्षक मोबाईल थोडा जरी कुठे पडला तरी तुटतात आणि अनेक युजर्स तुटलेल्या अवस्थेतही त्यांचा वापर करतात, असे अनेकदा दिसून आले आहे. असे केल्याने, तुम्ही केवळ तुमच्या फोनचे नुकसान करत नाही, तर तुम्ही स्वतःलाही धोक्यात आणत आहात.
ही काच इतकी तीक्ष्ण आहे की ती तुमची बोटे सहज कापू शकते. त्यामुळे चांगल्या दर्जाचा टेम्पर्ड ग्लास वापरणे कधीही चांगले. चांगल्या दर्जाच्या टेम्पर्ड ग्लाससाठी तुम्हाला 1000 रुपये खर्च करावे लागतील. मात्र, यामुळे मोबाइलला योग्य ती सुरक्षितता मिळतेच आणि तुम्हाला देखील धोका होत नाही, यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.