Share

सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा; जुही चावल्याच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी फटकारले

juhi chawla

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पर्यावरणाच्या बाबतीत नेहमी सजग राहतात. पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक कार्यात ते उस्फुर्तपण सहभागी होतात. यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जुही नेहमी काळजी करताना तसेच याबाबत बोलताना दिसून येते. आताही जुहीने एक ट्विट शेअर करत पर्यावरणासंबंधी एक चिंता व्यक्त केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

जुहीने शुक्रवारी सकाळी एक ट्विट केला. यामध्ये तिने लिहिले की, ‘खूप वाईट वाटत आहे. आज सकाळी उठले आणि मला वाटले की, मी हवेतील सर्व रसायनांचा श्वास घेत आहे. मुंबईत ताजी हवा असे अजिबातच नाही’. जुहीच्या या ट्विनंतर त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. तिच्या या ट्विटला नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसून येत आहेत.

https://twitter.com/iam_juhi/status/1512275724916338690?s=20&t=2opAhPnxX9SiO8YqTDsvQw

एकाने तिच्या या ट्विटवर कमेंट करताना लिहिले की, ‘मॅडम ट्विट करून तुमच्या भावना व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही अधिकाधिक झाडे लावा. सध्या फक्त सोशल मीडियावर नाटक सुरु आहे. प्रत्यक्षात तर काही करत नाही. बोलण्याशिवाय काही करतसुद्धा जा’.

https://twitter.com/raghavarora539/status/1512291623626969092?s=20&t=2opAhPnxX9SiO8YqTDsvQw

दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘तुमच्या घरात किती गाड्या आहेत? आणि कोणत्या प्रकारचा बिझनेस तुम्ही करता? तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेता? आपल्या देशात टीका करणे आणि प्रसिद्ध होणे खूप सोपे काम झाले आहे’.

जुहीच्या या ट्विटनंतर तिला अनेकजण ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे काही जण तिला पाठिंबाही देत आहेत. एकाने जुहीच्या ट्विटवर टीका करणाऱ्याला उत्तर देत एक ट्विट केला. यामध्ये जुहीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झाडे लावत महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे सांगत यासंदर्भातील काही फोटो शेअर केले. ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘वृक्षारोपण करणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये जुही चावला एक अग्रगण्य उदाहरण आहे’.

https://twitter.com/iamanujagrawal/status/1512286236513341440?s=20&t=2opAhPnxX9SiO8YqTDsvQw

दरम्यान, जुही चावला ५ जी तंत्रज्ञानाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे फारच चर्चेत आली होती. जुहीचे म्हणणे होते की, ५ जी तंत्रज्ञान आणल्यास या रेडियोफ्रीक्वेन्सीमुळे लोकांच्या आरोग्यासोबत पर्यावरणावरही वाईट परिणाम होणार. त्यामुळे महिला, पुरुष, मुले, प्राणी, जीवजंतू, वनस्पती आणि पर्यावरण या सर्वांवर होणाऱ्या परिणामाकडे बारकाईने लक्ष देऊन ५ जी तंत्रज्ञान सुरक्षित आहे की नाही हे सुनिश्चित करावे.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! हॉलिवूड अभिनेता विल स्मिथवर दहा वर्षांची बंदी, ऑस्करने घेतला निर्णय
राम गोपाल वर्मांना होता बाहेरच्या बायकांचा नाद, पत्नीला कळताच प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला होता चोप
राजमौलींनी प्रेक्षकांना बनवले उल्लू, RRR चित्रपटात झाल्यात ‘या’ १० चुका, तुमच्या लक्षात आल्यात का?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now