आपल्या काळातील ‘हिरो नंबर वन’, ‘राजा बाबू’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘दुल्हे राजा’ सारखे उत्कृष्ट चित्रपट करणारा अभिनेता ‘गोविंदा’ सध्या म्युझिक व्हिडिओजमध्ये आपली छाप पाडत आहे. त्याचे ‘हॅलो’ हे नवीन गाणे रिलीज झाले असून, त्याला चांगलीच दाद मिळत आहे. त्याचे चाहते सोडले तर इतर त्याला हे सर्व न करण्याचा सल्ला देत आहेत.
एका यूजरने तर म्हंटले की कृपया ९० च्या दशकातून बाहेर या आणि ते २०२२ मध्ये आहेत, ९० च्या दशकात नाही. याआधीही गोविंदाने दोन गाणी रिलीज केली होती, जी प्रेक्षकांना फारशी आवडली नव्हती. ‘हॅलो’ या नव्या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात गोविंदासोबत निशा शर्मा दिसत आहे.
यामध्ये गोविंदा ट्रेडमार्क स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याचे लिरिक्स गोविंदाने रोहित राज सिन्हासोबत संगीतबद्ध केले आहेत. गोविंदाने त्याचे नवीन गाणे इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘गोविंदा सर कृपया ९० च्या दशकातून बाहेर या.’
त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले, ‘या जगाने २०२२ मध्ये मूव्ह केले आहे, पण गोविंदा अजूनही ९० च्या दशकात आहे.’ एका युजरने असेही लिहिले आहे की, कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. त्याने कमेंट केली, ‘जुन्या मेगास्टारला टिकून राहण्यासाठी असे थर्ड क्लास म्युझिक व्हिडिओ बनवावे लागतात. काहीही परर्मनंट नाही हे यावरून सिद्ध होते.’