नागराज मंजुळे निर्मित झुंड हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी या चित्रपटातील कथेचे, त्यातील गाण्याचे तसेच अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांच्या कामाचं कौतुक केले आहे.(Netizens slapped Shefali doctors criticizing Nagraj Manjule;)
त्याचसोबत दुसरीकडे लेखिका शेफाली वैद्य यांनी नागराज मंजुळे यांच्या चित्रपटावर टीका केली आहे. “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, असा सवाल त्यांनी केला. शेफाली यांच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या ट्विटरवॉरनंतर सोशल मीडियावर ‘झुंड’ चित्रपटाबाबत काही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्सद्वारे नागराज यांच्या चाहत्यांनी शेफाली यांना उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे विविध मीम पोट धरून हसवणारे आहेत.
एका मीममध्ये मैफिलीत बसल्यासारखा नागराज यांचा फोटो एडीट करून त्यावर ‘आग ऐसी लगाई मजा आ गया’ , असं लिहिलं आहे. शेफाली वैद्य यांना हे उत्तर दिलं असल्याचं म्हटलं आहे. आणखी एक मीम आहे. त्या मीममध्ये उपरोधिकपणे लिहलं आहे की, ‘माणुसकीच्या शत्रूसंगे ‘झुंड’ आमुचे सुरू’.
रजनीकांत यांच्या एका चित्रपटातील सीनला कट करून त्यावर नागराज यांचा फोटो दिला आहे. तो फोटो पोस्ट करत त्यावर ‘नागराज सर अख्ख्या बॉलिवूडला…क्यू हिला डाला ना?’ असं लिहलं आहे.
महत्वाच्या बातम्या
मोलकरणीने हार्पिक आणि झंडू बामपासून बनवला आय ड्रॉप, ७३ वर्षीय महिलेला केले आंधळे; कारण वाचून हादराल
पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा