टीव्ही क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या नवनवीन नौटंकीमुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला इंडस्ट्रीत ड्रामा क्वीन म्हटले जाते. अशातच राखी सावंतचा नवा ड्रामा लेटेस्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. यामध्ये तिने बनावट बेबी बंप घातला आहे आणि ती मसिहा पैगंबरला जन्म देणार असल्याचे सांगते. यासोबत ती अनेक गोष्टी सांगत आहे.
नुकतेच, याआधी देखील राखी सावंतने आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर प्रतिक्रिया देऊन खूप चर्चेत आली होती. आता लेटेस्ट व्हिडिओमध्ये तिचे काय म्हणणे आहे ते पाहूया. राखी सावंतने या व्हिडिओमध्ये बनावट बेबी बंप परिधान केलेले दिसत आहे. ती म्हणते की माझ्या हृदयात आदिल आहे आणि तो या मुलाचा पिता आहे.
आजकाल पृथ्वीवर पाप वाढत आहे, अशा परिस्थितीत मी एका मसिहाला जन्म देणार आहे. देवाने मला सांगितले की मी एका मसिहाला, एका पैगंबराला जन्म देईन. सर्व पापी लोकांना माझा येणारा मुलगा सुधारेल. माझी मुलं बाहुबली होतील आणि ते सगळं नीट करतील.
राखी सावंत फेक प्रेग्नन्सीसोबतच तिचे चाहते आणि मित्रही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. शेवटी, राखी सावंत बनावट बेबी बंपमधील फुगा काढून तो फोडते. बिग बॉसची स्पर्धक शमिता शेट्टीनेही राखी सावंतच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर कमेंट केली आणि हसणारा इमोजी शेअर केला. त्याचवेळी राखीच्या या नौटंकीवरून चाहत्यांनी तिला ट्रोल केले.
नुकतीच राखी सावंतने आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर प्रतिक्रिया देताना मी प्रेग्नंट कधी होणार असे सांगितले. माझ्या आयुष्यातही लवकरच चांगली बातमी येईल. लग्नाआधी मी कधीच गरोदर राहणार नाही, असे ती म्हणते. माझ्या पोटी एक दिवस मसिहा जन्म घेईल. राखीच्या या विधानाला ती आलियाला टोमणे मारत असल्याचे समजत होते.
महत्वाच्या बातम्या-
राखी सावंतच्या आरोपांवर रितेशनं सोडलं मौन, म्हणाला, माझे पैसै उडवत होती अन्
राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
राखी सावंतला हात लावण्याचा प्रयत्न करत होता चाहता, कॅमेऱ्यात कैद झाली पुर्ण घटना, पहा व्हिडीओ
राखी सावंत आणि रितेशने घेतला घटस्फोट; कारण समोर आल्यानंतर चाहते झाले भावूक