मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक रोहित राऊत (Rohit Raut) आणि त्याची पत्नी जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे दोघेही अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये कधी दोघे मजामस्ती करताना दिसून येतात. तर कधी दोघांच्या सुरेल आवाजात गाणं गाताना दिसून येतात. नुकतंच जुईलीने रोहितसोबतचा एक सुंदर गाणं गात असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. परंतु, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट दिल्या आहेत.
जुईलीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, रोहित आणि जुईली सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चांद छुपा बादल में हे गाणं गात आहेत. दोघेही त्यांच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. अनेकजण रोहित आणि जुईलीच्या गायनाचे कमेंटद्वारे कौतुक केले.
तर काहींनी यावर मजेशीर कमेंट केले आहेत. एकाने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, जुईली सारखं खातच असते का रे? दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘अंघोळ करा दोघं पण’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘अगं जुईली बाळाला अंघोळ तरी घालायचीना तुझ्या..’ रोहितचा व्हिडिओतील अवतार पाहून चाहते जुईलीला हा सल्ला देत आहेत. सध्या हे कमेंट्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, रोहित आणि जुईलीने २३ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली होती. पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाड्यात पारंपारिक अंदाजात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या या लग्नात कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रोहित राऊतने २००९ साली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये सहभागी झाला होता. तसेच यामध्ये त्याने टॉप ५ मध्ये जागा मिळवली होती. रोहितने या शोचे विजेतेपद मिळवले नसले तरी त्याने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. आतापर्यंत रोहितने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.
रोहितने प्लेबॅक सिंगरच्या रूपात ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’, ‘वन वे तिकिट’, ‘अवताराची गोष्ट’, ‘वजनदार’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. मराठीसोबत हिंदीतही त्याने आपल्या गायनाचे कौशल्य दाखवले आहे. हिंदीतील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’मध्येही २०१९ साली तो झळकला होता.
दुसरीकडे रोहितची होणारी बायको जुईलीसुद्धा गायिका आहे. ती मुळची पुण्याची आहे. जुईलीने ‘सारेगमप सुर नव्या युगाचा’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोची ती विजेतासुद्धा बनली. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुईली नेहमीच सक्रिय असते. तसेच तिचं युट्यूब चॅनलदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध भोजपुरी गायिकेचा MMS झाला लीक, गायिकेने लोकांना शेअर न करण्याचे केले आवाहन
सामंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा करतोय लग्न? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण
“सुप्रीया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचे मत वाईट, लवकरच शरद पवारांना ‘ते’ रेकाॅर्डींग ऐकवणार”