बिझनेसमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्याने कृशा शाहसोबत लग्न गाठ बांधली आहे. लग्नसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका फोटोकडे पाहून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत, आणि त्याची प्रचंड चर्चा होत आहे.
एवढ्या मोठ्या आणि डोळे दिपवणाऱ्या सोहळ्यामध्ये विविध बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आणि अनेक व्यावसायिकांची उपस्थिती दिसून आली. यामध्ये लक्षणीय उपस्थिती होती, ती म्हणजे टीना अंबानी यांची थोरली जाऊ आणि अनमोलची मोठी आई, अर्थात नीता अंबानी यांची. या लग्नातील त्यांची उपस्थिती चाहत्यांसाठी उत्सुकतेची होती.
या लग्नसोहळ्यामध्ये नीता अंबानी या एक आधार म्हणून पाहिला मिळाल्या. मोठी आई म्हणून त्यांनी लग्नात स्वीकारलेली जबाबदारी दिसून आली. व्हायरल झालेल्या एका फोटोत त्या सप्तपदी सुरु असताना व्यासपीठावर टीना यांच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातले बरेच फोटो व्हायरल झाले.
पाहता पाहता या फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंटही येऊ लागल्या आहेत. लग्नातील नीता अंबानी यांच्या एका फोटो वरती येणाऱ्या कमेंट्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोवरती नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत. सर्वांच्या प्रश्नांचा ओघ सारखाच होता.
हा फोटो म्हणजे दुसरा तिसरा कोणाचा नसून, नीता अंबानी यांचा आहे. त्या टीना यांच्या शेजारी मास्क लावून बसल्या आहेत. फोटो पाहून त्या एकट्या वाटत होत्या. त्यांच्या व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांच्या कुटूंबातील इतर कोणताही सदस्य यावेळी दिसला नाही, किंवा त्यांपैकी कोणाचा फोटो अद्यापही सोशल मीडियावर आलेला नाही.
त्यामुळे नीता अंबानी एकट्या पडल्या का असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. काहींनी, नीता अंबानी या आपलं कर्तव्य बजावत पुतण्याच्या लग्नासाठी आल्या ही बाब अधोरेखीत करत नीता अंबानी यांच्या संस्काराचे कौतूक केले. नीता अंबानी या लग्नात अतिशय खुश असल्याचे नेटकऱ्यांना फोटोमधून समजले.