Share

एकेकाळी घरोघरी जाऊन देवीची गाणी म्हणायची नेहा कक्कर, आज आहे कोट्यावधींची मालकीण

नेहा कक्कर आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी गायिका आहे. नेहा कक्करची गाणी तरुणाईला वेड लावतात. नेहा जर गाणार असेल तर ते गाणं हिटच होणार, असा अनेक सिनेमा दिग्दर्शकांना विश्वास असतो. नेहाला असं स्वतः ब्रँड बनायला खूप मेहनत घ्यावी लागली. इथं पर्यंतचा तिचा प्रवास खूप खडतर आहे. (Neha Kakkar, who used to go from house to house and sing songs of Goddess,.)

नेहा सुरुवातीला पंजाबमध्ये असताना लोकांच्या घरोघरी जाऊन देवीच्या जगरत्याची गाणी गायची. ती तिच्या मोठ्या बहिणीसोबत म्हणजेच सोनू कक्करसोबत गायला अनेक जगरात्यांना गेली आहे. नेहा कक्करने गायक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. वाईट दिवसांचा सामना केला. वेळेशी जुळवून घेत ती काम करत राहिली.

आज अनेक सिनेमांमध्ये नेहाचे गाणे असतेच. आवर्जून बॉलिवूड सिनेमा दिग्दर्शक तिचे गाणे सिनेमात टाकतात. कारण तिचे गाणे टाकले तर हिट होण्याची त्यांना खात्री असते. एका सिंगिंग रिएलिटी शो पासून तिचा पार्श्वगायिका बनण्याचा प्रवास सुरु झाला होता. तिला त्या शोमुळे ओळखले जाऊ लागले. एका सिंगिंग शोची स्पर्धक असलेली नेहा आज प्रसिद्ध गायिका आहे.

नेहाने तिच्या गायनाच्या जोरावर भरपूर पैसे कमावले आहेत.आज एक गाणं गायला ती कोट्यवधी रुपयांचं मानधन घेते. नेहाची वार्षिक कमाई ३३ कोटी इतकी आहे. अधिक माहितीनुसार, नेहा एका गाण्यासाठी कमीत कमी २५ लाख इतकं मानधन घेते. तिच्याकडे खूप महागड्या कार आहेत. ती गाणी गाण्यासोबतच रियालिटी शोची परीक्षक म्हणून पण काम करताना दिसते, त्यामधूनही तिला भरपूर पैसे मिळतात.

नेहाला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिच्या गाण्याची हटके स्टाईल, तिचे ड्रेससिंग स्टाईल यामुळे ती खूप लोकप्रिय आहे. नेहा अनेक गरजू , मेहनती, गायनाची आवड असणाऱ्या मुलांना मदत करताना दिसते. या गोष्टीमुळे लोक नेहाचे कौतुक करत असतात.

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या अफेअर्सची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये होती. ते अनेकवेळा सोबत दिसायचे मात्र त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर रोहनप्रीत सिंग या सिंगरसोबत नेहाने लग्न केलं. नेहा तिच्या कामामुळे आणि वैयक्तिक गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. नेहा आज प्रसिद्ध गायिका असून कोट्यवधीची मालकीण आहे.

महत्वाच्या बातम्या –
बॉलिवूडच्या दृष्टीनं मराठी माणूस म्हणजे…;अशोक सराफांनी केली बाॅलीवूडची पोलखेल
नवा झुनझुनवाला झाला तयार! २३ व्या वर्षी शेअर मार्केटमधून कमावले १०० कोटी; १७ वर्षांचा असल्यापासून करतोय ट्रेडींग
मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते; ‘या’ नेत्याने मोदी सरकारचा खरा चेहरा आणला समोर

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now