Share

नेहा आणि यशची रेशीमगाठी जुळण्याआधीच तुटणार? आजोबांशी खोटे बोलणे नेहाला पडणार महागात

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत सिम्मीमुळे नेहा खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या बाजूने यश असताना देखील नेहाला खोटे बोलणे भाग पडले आहे. मालिकेच्या पुढील भागात नेहा सिम्मीच्या डावाला फसत आजोबांसोबत खोटे बोलणार आहे.

यशच्या आजोबांची इच्छा आहे की , नेहाने लग्न करुन पॅलेसमध्ये राहिला यावे. परंतु अद्याप परीविषयी आजोबांना माहित नसल्यामुळे यश आणि नेहाचे लग्न झालेले नाही. मात्र तरी देखील आजोबांना खोटे बोलत नेहा लग्न केल्याशिवायच पॅलेसमध्ये राहिला येणार आहे. नेहा आजोबांना सांगणार आहे की, यशने आणि मी लग्न केले आहे.

नेहाचे हे खोटे ऐकून यशलाही धक्का बसणार आहे. नक्की नेहा खोटे का बोलली असा प्रश्न यशला पडणार आहे. त्यामुळे यश आणि नेहाच्यात दुराव्या येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा आनंद सिम्मीला होणार आहे. सिम्मीला यश आणि नेहाचे लग्न मान्य नाही. त्यामुळे ति या दोघांच्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र यश आणि नेहाला दुर करणे सध्या अशक्य आहे. मालिकेत अद्याप परी नेहाची मुलगी आहे हे अजून आजोबांना माहित झाले नाही. ज्यावेळी आजोबांना नेहाच्या पहिल्या लग्नाबदल समजते तेव्हाच त्यांची प्रकृती खालावते. यानंतर परीचे सत्य आजोबांना सांगणे राहूनच जाते. आता नेहा जर पॅलेसमध्ये राहिला आली तर परीकडे कोण लक्ष देईल हा प्रश्न नेहाला पडला आहे.

कारण की, आजोबांनाही परीचे सत्य माहित नसल्यामुळे नेहा परीला पॅलेसमध्ये आणू शकत नाही. तसेच परीने देखील यशला वडिल म्हणून स्वीकारलेले नाही. सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत एकीकडे यश आणि नेहा जवळ येत असतानाच त्याच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या मालिकेत आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूरलेले आहेत. तसेच आजोबांना परीचे सत्य समजल्यास ते काय भूमिका घेतील याचीही चिंता प्रेक्षकांना सतावत आहे.

महत्वाच्या बातम्या
सलमानचा पाय खोलात, शेजाऱ्याकडे सलमानविरोधात पुरावे, फार्महाऊसमध्ये पुरलेत अनेक स्टार्सचे मृतदेह
..त्यामुळे करिना कपुरने सैफ अली खानला दिली कडक सुचना, म्हणाली, ‘आता एकही मुल जन्माला घालायचे नाही’
राजामौलींच्या RRR ने अनेक बॉलिवूड चित्रपटांना चारली धुळ, ७ दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई
सलमानचा पाय खोलात, शेजाऱ्याकडे सलमानविरोधात पुरावे, फार्महाऊसमध्ये पुरलेत अनेक स्टार्सचे मृतदेह

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now