भट्ट कुटुंबाची लाडकी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कपूर घराण्याचा दिवा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. कपूर कुटुंबात (Kapoor Family) सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, पण ऋषी कपूर यांच्या अनुपस्थितीने दु:खही एकत्र तरंगत होते. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची एकुलत्या एक मुलाच लग्न पाहण्याची खूप इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी अनेक स्वप्ने स्वप्न पहिली होती, परंतु एप्रिल 2020 मध्ये त्यांची इच्छा देखील ऋषी कपूरसोबत काळाआड झाली.(Neetu Kapoor remembers her husband)
पत्नी नीतू कपूर नेहमीच पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करत होती. गुरुवारी जेव्हा मुलाचे लग्न झाले तेव्हा नीतू कपूरला पहिल्यांदा कपूर साहेबांची आठवण झाली की, आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सोशल मीडियावर नीतू कपूरने पती ऋषी कपूर यांची आठवण काढत सेहरामध्ये मुलगा रणबीर कपूरचा फोटो शेअर केला आहे.
नीतू कपूरने मुलगा रणबीर कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, हा कपूर साहेब तुम्हाला डेडिकेट आहे. आज तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. नीतू कपूरच्या या पोस्टवर संजय कपूर, सिकंदर खेर, मनीष पॉल अशा अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. त्याचबरोबर ऋषी कपूर यांची आठवण काढून चाहतेही भावूक झाले.
बुधवारी (13 एप्रिल) दोघांचा मेहंदी सोहळा झाला. पण यावेळी नीतू कपूर थोड्या भावूक झालेल्या दिसल्या. यावेळी नीतू कपूर पती ऋषी कपूर यांना खूप मिस करत होती. ऋषी यांच्या आठवणीत नीतू यांनी आपल्या मेहंदीमध्ये ऋषी कपूर यांचे नाव लिहिले आहे. मेहंदी सोहळ्यानंतर नीतू कपूर यांनी त्यांच्या हातावरील मेहंदीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यात ऋषी यांचे नाव दिसते.
ऋषी कपूर यांना वयाच्या 67 व्या वर्षी ल्युकेमिया (रक्त कर्करोग) झाला होता. या आजाराने ते बराच काळ आजारी होते. ऋषी कपूर यांच्या उपचारासाठी नीतू कपूर आणि रणबीर कपूरही परदेशात गेले होते. पण बराच काळ झुंज दिल्यानंतर 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या-
पार्टीनंतर मी पूजा भट्ट, रवीना टंडन, विक्रम, राहुल रॉयचा ड्रायव्हर व्हायचो, दीप तिजोरींचा खुलासा
आलिया-रणबीरच्या लगीनघाईत समोर आली ऋषी-नीतू कपूरची ४२ वर्षांपुर्वीची पत्रिका, पहा फोटो
..त्यामुळे रणबीर-आलिच्या लग्नाला उपस्थित नव्हते काका मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट, चर्चांना उधाण
पार्टीनंतर मी पूजा भट्ट, रवीना टंडन, विक्रम, राहुल रॉयचा ड्रायव्हर व्हायचो, दीप तिजोरींचा खुलासा