गेल्या काही आठवड्यांपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चांगलेच चर्चेत आले होते. कारण त्यांनी एकदम थाटामाटात आपला लग्न सोहळा पार पाडला होता. आजच्या काळात रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांची कमी नाही, विशेषतः मुलींना रणबीर खूप आवडतो. (neetu kapoor on alia bhatt)
रणबीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर काही काळापूर्वी त्याचे वडील ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला आणि आता तो त्याची आई नीतू कपूर आणि पत्नी आलिया भट्टसोबत राहत आहे. रणबीर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. पण आता त्याची आई म्हणजेच नीतू कपूर चर्चेत आली आहे.
आलिया भट्ट लग्नानंतर तिची सासू नीतू कपूरशी बोलत नाही अशी बातमी समोर आली आहे. याबाबत स्वत: नीतू कपूरनेच खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना नीतू कपूरने तिच्या आणि आलिया भट्टच्या नात्याबद्दल सांगितले होते. तसेच मस्करीत बोलताना म्हटले की, मला तिला आता सून बनवून पश्चाताप होतोय.
नीतू कपूरचे आजच्या काळात खूप मोठे नाव आहे आणि त्याचे कारण म्हणजे नीतू कपूरचे पती आणि मुलगा यांचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे. तसेच नीतू कपूर स्वतः देखील एक मोठ्या कलाकार आहे. नीतू कपूरचा मुलगा रणबीर कपूरचे काही आठवड्यांपूर्वीच लग्न झाले आहे.
एका मुलाखतीत नीतू कपूरने आलियावर भाष्य केले. आलिया भट्ट सून झाल्यानंतर माझ्याशी आधीसारखी बोलत नाही. आधी ती माझ्यासोबत खुप मनमोकळी बोलायची हवं ते सांगायची पण आता ती खुप गुपचूप असते, समोर असल्यावर काहीच बोलत नाही, असे नीतू कपूरने मुलाखतीत म्हटले आहे
तसेच मलाही आलियाशी जास्त काही बोलता येत नाही. कारण मला तिच्याशी बोलायचे असते, पण आलिया तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, असे नीतू कपूरने म्हटले आहे. सध्या नीतू कपूरने केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी धावली अपक्ष आमदारांच्या मदतीला; गद्दारीचे आरोप फेटाळत सेनेलाच सुनावले खडे बोल
अपक्ष आमदारांचे मॉनिटरिंग शिवसेनेकडेच होते म्हणत राष्ट्रवादीने पराभवाची जबाबदारी झटकली
“आता मला कुठल्याही प्रकारचा धोका नकोय”; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन