Share

नीरज चोप्राने केले वर्ल्ड चॅम्पिअन निखत जरीनचे अभिनंदन, बॉक्सरनेही दिले लक्षवेधी उत्तर, म्हणाली…

भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. गेल्या आठवड्यात गुरुवारी 25 वर्षीय निखतने फ्लाइंग वेट प्रकारातील अंतिम सामन्यात थायलंडची बॉक्सर जुतामास जितपॉन्ग हिचा 5-0 असा पराभव करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. महिला बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील 5वी महिला बॉक्सर ठरली आहे.(neeraj-chopra-congratulates-world-champion-nikhat-jareen)

या कामगिरीनंतर निखत जरीनचे(Nikhat Jareen) अभिनंदन करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या नावाचाही यात समावेश झाला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने स्वतःच्या शैलीत अभिनंदन करत त्याने सोशल मीडियावर लिहिले, ‘वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनचे खूप खूप अभिनंदन. निखत जरीन खूप छान.’

https://twitter.com/Neeraj_chopra1/status/1527525271309430784?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527525271309430784%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fother-sports%2Fnikhat-zareen-reply-went-viral-on-neeraj-chopra-congratulation-tweet-for-gold-medal-at-world-boxing-championships%2Farticleshow%2F91755307.cms

नीरज चोप्राच्या(Neeraj Chopra) या अभिनंदनावर निखत जरीनचे उत्तर आले आहे. निखतने लिहिले की, ‘ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांचे खूप-खूप आभार.’ या दोघांचे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहेत. कॉमनवेल्थ गेम्स या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये नीरज चोप्रा आणि निखत जरीन यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.

नीरजने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील(Australia) राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. दोघांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायचा होता, पण तो पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि पुढील वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन्ही खेळाडू भारताला सुवर्णपदक मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे. यासोबतच 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारतीय चाहत्यांना या दोघांकडून पदकांची अपेक्षा असेल.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now