अभिनेत्री नीना गुप्ता हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नीना त्यांच्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखले जातात. त्या कोणत्याही विषयावर त्यांचे स्पष्ट मत मांडत असतात. मग त्याचा परिणाम कसाही असो त्याबद्दल त्या जास्त विचार करत नाहीत. असेच एकदा कपिल शर्मा शोमध्ये (neena gupta in kapil sharma show) कपिलच्या एका प्रश्नावर नीना यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिले. त्यामुळे कपिलची बोलतीच बंद झाली होती.
नीना गुप्ता अभिनेत्री कंगना राणावतसोबत ‘पंगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा शो’ मध्ये आल्या होत्या. यावेळी कपिलने नीना यांना विचारले होते की, ‘आम्ही असं ऐकलं होतं की, तुम्हाला बेवॉच चित्रपटात पामेला एंडरसनची भूमिका साकारायची होती’. यावर उत्तर देताना नीना यांनी म्हटले की, ‘अरे माझे इतके मोठे बूब्स नाहीत ना मग कसं करणार’.
नीना यांच्या या बिनधास्त उत्तराने कपिलही लाजला होता आणि त्यांना नीना यांना म्हटले की, यावर काही व्हेज उत्तर मिळेल का? तेव्हा नीना यांनी म्हटले की, प्रश्नच नॉनव्हेज होता तर उत्तर व्हेज कसा मिळेल? यावेळी नीना यांच्या उत्तराने कपिलची बोलतीच बंद झाली होती. तसेच उपस्थित सर्व प्रेक्षकांनाही हसू अनावर झाले होते. नीना यांचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
नीना गुप्ता त्यांच्या चित्रपटांसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फारच चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यांनी त्यांची बायोग्राफी ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ८० च्या दशकात नीना गुप्ता वेस्टइंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशीपमध्ये राहिल्या होत्या. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असत पण त्यांनी लग्न केलं नाही.
विवियन रिचड्स यांच्याशी लग्न न करताच नीना यांनी त्यांची मुलगी मसाबाला जन्म दिला होता. तसेच मुलीच्या जन्मानंतर त्यांनी सिंगल मदरच्या रूपात मसाबाचे पालनपोषण केले. आज त्यांची मुलगी मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. तर २००८ साली नीना यांनी वयाच्या ५० व्या वर्षी दिल्लीतील विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. या लग्नामुळेही त्या फारच चर्चेत आल्या होत्या.
दरम्यान, नीना गुप्ता यांनी दीर्घकाळानंतर ‘बधाई हो’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते. त्यानंतर त्या ‘सरदार का ग्रँड सन’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘मसाबा मसाबा’ यासारख्या अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये दिसून आल्या. नीना ‘८३’ या चित्रपटात शेवटच्या दिसल्या होत्या. तर लवकरच त्या ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय ‘मसाबा मसाबा सीझन २’ आणि ‘पंचायत सीझन २’ या वेबसीरीजमध्येही त्या दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘आमच्या जीवाला धोका, आम्ही पळून जाऊन लग्न केलंय’, अज्याच्या पोस्टने उडाली खळबळ
‘मी मिस इंडिया युनिव्हर्स आहे’, विकिपीडियावरील स्वत:बद्दलची ‘ही’ माहिती वाचून संतापली तनुश्री दत्ता
अभिनेत्री प्रियंका चोप्रा गरोदर न राहताही झाली आई; ‘या’ पद्धतीने दिला बाळाला जन्म