NCP : शिंदे – फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. मात्र, त्याआधी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक जोरदार ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटबद्दल चर्चांना उधाण आले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोहित कंबोज यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना तुरुंगात भेटणार आहे, असे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच २०१९ साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन नेते मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. आता लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे मोहित कंबोज यांनी ट्विट केले. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली. मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. हा भोंगा शेतकरी, जीएसटी या प्रश्नावर कधीही वाजत नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
पुढे, ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे,” असेही ते म्हणाले.
तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनीदेखील मोहित कंबोज यांच्यावर ट्विटद्वारे टीकास्त्र सोडले आहे. मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतो? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरासकट लावतो, असे त्यांनी ट्विट केले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्यावर चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
Britain : नाॅनव्हेज खाणाऱ्यांनो सावधान! मांस खाल्ल्याने झाला धडधाकट तरूणाचा मृत्यू
(Monsoon sessions)दरवाजे अद्यापही खुले आहेत पण..; बंडखोर आमदारांसमोर आदित्य ठाकरेंनी ठेवली ‘ही’ अट
विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी द्यावी; राष्ट्रवादीची मागणी
Bollywood: आता बाॅलीवूडवरही ईडीची काडी; अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस २०० कोटींच्या घोटाळ्यात आरोपी