ncp win in maval | रविवारी ७ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या होत्या. मंगळवारी त्या निवडणूकांचे निकाल हाती लागले आहे. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे निकाल लागले आहे. तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.
मावळ तालुक्यातही निवडणूक झाली होती. त्या निवडणूकीत ९ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. मावळच्या माजी आमदारांनी ही निवडणूक अटीतटीची केली होती. पण या निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार सुनीळ शेळके यांनी बाजी मारली आहे. तर शिंदे गटाला खातेही उघडता आलेले नाही.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे स्वत: मावळात ग्रामपंचातीच्या प्रचारासाठी मावळात आले होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ज्या गावात त्यांनी प्रचार केला होता. त्या गावातच राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच निवडून आला आहे. त्यामुळे भाजपचा गड म्हणून ओळखला जाणारा मावळ आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनत जाताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव मावळमध्ये पडताना दिसून येत आहे. त्याची सुरुवात २०१९ मध्ये झाल्याचे दिसून येते. तिथे पहिल्यांदा राष्ट्रवादीने भाजपचा पराभव केला होता. त्यांनी राज्यमंत्री असलेले बाळा भेगडेंचा पराभव केला. सुनील शेळकेंनी त्यांचा पराभव केला.
त्यानंतर श्री क्षेत्र असलेली देहू नगरपालिकाही राष्ट्रवादीने बहुमताने जिंकली होती. आता मावळातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये एका जागेची निवडणूक बिनविरोध राष्ट्रवादीने जिंकली तर इतर फक्त दोनच जाग्यावर भाजपला विजय मिळवता आला.
देवले, इंदोरी, कुणेनामा, वरसोली, निगडे आणि सावळा या ठिकाणी राष्ट्रवादीने विजय मिळवत आपला सरपंच निवडून आणला आहे. अशात मावळचे खासदार हे श्रीरंग बारणे हे आहेत. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हा ते सुद्धा त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे भाजपसोबत बारणेंनीसाठी सुद्धा हा मोठा धक्का आहे.
महत्वाच्या बातम्या-
NCP : राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या शिवसेनेला धोका; शिंदे गटातील बड्या मंत्र्याच्या मुलीला बनवलं सरपंच
mahavikas aghadi : “राज्यात महाविकास आघाडीच पहिल्या क्रमांकावर, भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटे”
Pune : हॅलो…श्रीमंत महीलांसोबत शरीरसंबंध ठेवा, तुम्हाला त्याचे पैसे देतो; पुण्यात थेट फोनवर ऑफर