Share

सत्तेचा माज! ‘पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी

ncp

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता.

तसेच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. यामुळे काही नेत्यांना अटक देखील करण्यात आली आहे. पुन्हा एकदा खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष (NCP student leader) आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळली व आणखी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या या राष्ट्रवादीच्या नेत्याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच याप्रकरणी एका २३ वर्षांच्या तरुणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी अलीकडेच सोशल मीडिया व्यवसायासाठी एक ऑफिस सरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे 50 लाखांची मागणी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपींनी 50 लाखांची मागणी केली होती. पण फिर्यादीनं पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीस ‘तू आम्हाला पैसे का देत नाहीस. तुला आम्ही पैसे मागतो ते समजत नाही का, तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही का, तुला पुण्यात शिक्षण करू देणार नाही. तुला संपवून टाकू’ अशा धमक्या दिल्या.

दरम्यान, धमक्या देऊन फिर्यादीकडून पाच लाख रुपये बैंक ट्रान्सफरद्वारे घेतले. तसेच करण कोकणे याने आणखी एका तरूणाकडून २ ते ३ लाख रुपये रोख स्वरूपात घेतली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार रमेश बोरनारे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) याठिकाणी शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांशी मिळून भावजयीस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पैसा वसुल! ३०० करोडपेक्षा जास्त बजेट असलेले ‘हे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
वा रे पठ्ठ्या! संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मावळ्याने अडवली थेट राऊतांची गाडी
शिवसेनेच्या बड्या नेत्याची आयकर विभागाकडून १०० तास चौकशी, २ कोटी रकमेसह कागदपत्रे केली जप्त
“तिसऱ्या मुलासाठी पत्नीकडे रोज ऍप्लिकेशन देतो”, पतीच्या या उत्तरावर लाजली भाग्यश्री, पहा व्हिडीओ

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now