ncp rupali thombare angry on rahul shewale | शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर राहूल शेवाळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बलात्काराच्या आरोपांमागे राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा हात असल्याचे म्हटले आहे.
तसेच ज्या महिलेने तक्रार केली आहे. तिला भडकवण्यात आले आहे, असेही राहूल शेवाळे यांनी म्हटले आहे. आता राहूल शेवाळे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या शेवाळेंवर खुपच आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता दुसऱ्यावर आरोप करत आहात. तुम्हाला तुमच्या या गोष्टीची लाज कशी वाटत नाही? असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे. एका वृत्तावाहिनीशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राहूल शेवाळेंवर टीका केली आहे.
राहूल शेवाळेंची पूर्ण पत्रकार परिषद ऐकून त्या पीडित मुलीसोबत मिळून एक पत्रकार परिषद घेणार आहे. तिथे पोलिस सुद्धा असतील. मुळात हे प्रकरण झालं तेव्हा महाविकास आघाडी सत्तेत होती. मला वाटतं एखाद्या खासदाराने दाऊद एनआयए यांना मध्ये आणणं म्हणजे बिकट परिस्थिती आहे, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
राहूल शेवाळे यांचे ज्या महिलेशी संबंध होते. तिचा दाऊदशी संबंध आहे असे मानले तर शेवाळे यांनी त्या संबधांमध्ये असताना देशाच्या हिताची असलेली गोपनीय माहिती तिला सांगितली नसेल हे कशावरुन? पुढे तिने ती माहिती दाऊदला दिली आहे की नाही? हे विचारणं भाग आहे, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
तसेच राहूल शेवाळे हे खासदार पदावर आहे. असे असतानाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं. आता ते सरळ सरळ दुसऱ्यांवर आरोप करत आहे. असं काही करण्याची तुम्हाला लाज कशी काय वाटत नाही? आम्ही काय मूर्ख नाही आहोत, असेही रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
पीडित महिलेवर गुन्हे दाखल केले जात आहे. तिच्या जीवाला राहूल शेवाळेंपासून धोका आहे. तिचा जर घातपात झाला तर त्याला पूर्णपणे जबाबदार राहूल शेवाळे हेच असतील. कारण राहूल शेवाळे हे सातत्याने पीडितेला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही ठोंबरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Sushma Andhare : “एकनाथ शिंदेंच्या गटातील २० आमदार भाजपात सामील होणार”
subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”
जर तुमचे आधारकार्ड 10 वर्षे जुने असेल तर ‘हे’ काम नक्की करा; UIDAI ने दिले महत्वाचे आदेश