एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असतानाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे पडसाद उमटत आहेत.
काश्मीरमध्ये सामान्य नागरिक तसेच काश्मीरी पंडीतांच्या हत्यांचेही सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्राने काश्मीरी पंडीतांच्या सुरक्षेचे अनेक दावे केले. मात्र, हत्यासत्र थांबलेले नाही. तर आता यावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. गुरुवारी दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकासह दोघांची हत्या केल्यावर ही बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
तर याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. “आज कलम ३७० काढून टाकले, तरीही काश्मीर हिंदूची तीच अवस्था का? काश्मीर फाईल्सचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? असे सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1532651227808296960?s=20&t=9xWzTZMJ-AYWgO6UqbYeww
याचबरोबर पुढे राष्ट्रवादीने म्हंटले आहे की, ‘काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजप नेते देखील शांत का?”, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. पुढे ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला चांगलच लक्ष केलं आहे.
ट्विटमधून राष्ट्रवादीने म्हंटलं आहे की, ‘काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होते आहे. तेव्हाही भाजपच्या पाठिंब्याचे सरकार होते, आजही केंद्रात भाजपचे सरकार आहे. फरक एवढाच आहे की, अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते.’
महत्त्वाच्या बातम्या
‘विक्रम’ चित्रपटातील कलाकारांनी घेतले कोट्यवधींचे मानधन; आकडा वाचून डोळे फिरतील
“आम्ही योगींनाच मत दिलं तरी त्यांनी आमच्या ५० वर्ष जुन्या घरावर बुलडोजर चालवला”
मी जुही, काजोल, उर्मिला, शिल्पासोबत बेडवर…; शाहरुख खानने केला धक्कादायक खुलासा
कश्मीरमध्ये पाकडे भारतीयांच्या हत्या करताहेत अन् हा भारतीय क्रिकेटर त्यांच्यासोबत खेळायला तडफडतोय