Share

राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी! ‘या’ राज्यात सात आमदार निवडून आणत पटकावले विरोधी पक्षनेतेपद

नागालँड निवडणूक निकाल 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली बातमी मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सात जागा जिंकल्या आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील आणखी एक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) दोन जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळाले आहे. 60 जागांपैकी 37 जागांवर विजयी होताना दिसत आहे.

यामध्ये एनडीपीपीला 25 तर भाजपला 12 जागा मिळत आहेत. येथे सरकार स्थापनेसाठी 31 जागांची आवश्यकता आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 6 जागांवर निवडणूक लढवली, पण एकही जागा जिंकता आली नाही. सर्व जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

दुसरीकडे भाजपने 20 जागांवर उमेदवार उभे केले आणि त्यापैकी 12 जागा जिंकल्या. काँग्रेसने 18 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांचे खातेही उघडले नाही. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काँग्रेसची हीच स्थिती यावेळीही राहणार आहे.

चिराग पासवान यांच्या पक्ष लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) राज्यात 2 जागा मिळाल्या, तर चार अपक्ष उमेदवारही निवडणुकीत विजयी झाले. नागा पीपल्स पार्टीही 2 जागांवर आघाडीवर आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूने एक जागा जिंकली आणि त्यांना 3.24 टक्के मते मिळाली.

संध्याकाळी 5.30 वाजताच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या टक्केवारीनुसार एनडीपीपी 32.33 टक्के मतांसह पहिल्या स्थानावर आहे, तर मित्रपक्ष भाजपला 18 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस 3.54 टक्क्यांवर घसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी सहा उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
1) A Pongshi Phom
2) Y. Mankhao Konyak
3) P Longon
4) S. Toiho Yeptho
5) Namri Nchang
6) Y Mhonbemo Humtsoe

दुसरीकडे, नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजेच एनडीपीपी पार्टी आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रिओ आता नागालँडचे पाचव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.

jएनडीपीपी आणि भाजपच्या युतीने 60 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री रिओ यांनी ज्येष्ठ नेते एससी जमीर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यांनी तीन वेळा राज्याचे नेतृत्व केले आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now