हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतेच पुण्यात राज्यपाल आणि आमदार-खासदारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. पुण्यात भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष केले.
या सभेदरम्यान, आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं आहे. “आत्ताचे सरकार राज्यपालांचे ऐकणारे सरकार आहे”, असं म्हणत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना चिमटा काढला. तर “आमदारच हा कामदार असतो आणि राज्यपाल नामधारी असतो”, असं हटके प्रत्युत्तर कोश्यारी यांनी दिलं.
वाचा सभेत नेमकं काय घडलं?
दरम्यान, या सभेत या तिघांमद्धे चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली. या कार्यक्रमा दरम्यान, आमदार दिलीप मोहिते यांनी पहिल्यांदा राज्यपालांना लक्ष केलं. . “आत्ताचे सरकार राज्यपालांचे ऐकणारे सरकार आहे”, असं म्हणत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना चिमटा काढला.
तर “आमदारच हा कामदार असतो आणि राज्यपाल नामधारी असतो”, असं हटके प्रत्युत्तर कोश्यारी यांनी दिलं. यानंतर अमोल कोल्हे यांनी राज्यपालांना लक्ष केलं. काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुरुबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
दरम्यान, त्याचाच धागा पुन्हा अमोल कोल्हे यांनी धरला. कोल्हे यांनी राज्यपालांना सांगितल की, छत्रपतींचे गुरु हे त्यांचे आई-वडील होते. याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत नसल्याची खंतही यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या