ncp making shivsenas sarpanch | रविवारी ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यानंतर आता मंगळवारी या निवडणूकांचे निकाल हाती लागले आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहे. कुठे शिंदे गटाचा विजय झाला आहे, तर कुठे ठाकरे गटाला यश मिळाले आहे.
अशात विळ्या भोपळ्यात शिंदे गटाच्या शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. दैठण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंग पंडित यांच्या गटाने विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रेरणा प्रतापसिंह पंडित या सरपंचपदावर निवडून आल्या आहे.
प्रेरणा पंडित या शिंदे गटातील नेते आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या आहे. त्यांनी ठाकरे गटातील शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव केला आहे. प्रेरणा पंडित यांचे गेवराई तालुक्यातील दैठण हे सासर आहे.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चुलतबंधू संभाजीराव यांच्या प्रेरणा या स्नुषा आहे. दैठण हे बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांचे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित यांचेच वर्षेस्व असून यंदाही त्यांच्याच गटाने विजय मिळवला आहे.
दरम्यान, यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ठाकरे गटातील शिवसेनेच्या बदामराव पंडित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरसिंह पंडित या दोन गटांमध्ये मुख्य लढत झाली. या लढतीत अमरसिंह पंडित यांनी विजय मिळवला आहे. यामध्ये त्यांचे सर्वच्या सर्व ९ सदस्य विजयी झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रेरणा प्रतापसिंह पंडित या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शुभांगी निळकंठ पंडित या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. ही निवडणूक तशी अटीतटीची झाली होती. पण अखेर राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली.
महत्वाच्या बातम्या-
mahavikas aghadi : “राज्यात महाविकास आघाडीच पहिल्या क्रमांकावर, भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटे”
kiran agashe : दोन दिवसांवर साखरपुडा आला असतानाच तरूणीचा तडफडून मृत्यू; घटना वाचून काळीज हेलावून जाईल
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने पुण्यातील नगरसेवकाच्या तोंडावर फेकले पाणी; घाणेरड्या मागणीमुळे संतापली अभिनेत्री