विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै मतदान पार पडणार आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रपतिपदाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून पवारांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे युपीएतील बऱ्याच पक्षांनी पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. एक सल्ला देखील सोनिया गांधी यांनी पवारांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार जर विरोधी पक्षाचे उमेदवार होणार असतील, सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यामुळे विरोधी पक्षाची वाट आणखी सोपी होईल, असा सल्ला सोनिया गांधी यांनी शरद पवारांना दिला असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
दरम्यान, वाईएसआर आणि बीजू जनता जलकडून काँग्रेसच्या या रणनीतीला सुरूंग लावण्याची शक्यता आहे. अजूनही बीजू जनता दल आणि वाईएसआर हे काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक असल्याचे चित्र आहे. समजा शरद पवार यांना विरोधी आघाडीकडून जर उमेदवारी देण्यात आली तर या दोन्ही पक्षांसोबत संवाद साधणे सोपे होणार आहे. पण, शरद पवार यावर काय बोलतात, याकडे लक्ष लागलं आहे.