पवार कुटुंबातील कर्ता म्हणजेच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद हे अतिशय बुद्धिमान आहेत. ही बातमी आहे पवारांच्या लाडक्या नातीची..! पवार यांची नात अत्यंत मानाच्या ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिटमध्ये ग्रामीण भागाचे नेतृत्व करणार आहे.
यामुळे सध्या पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. देवयानी पवार या शरद पवार यांचे पुतणे रणजीत पवार आणि शुभांगी पवार यांची कन्या आहे. रणजीत पवार हे शरद पवारांचे सर्वात ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. आता देवयानी पवार (Devyani Pawar) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WEF) चमकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवयानी पवार (Devyani Pawar) या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात डब्ल्यूईएफच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या परिषदेत सहभागी होतील. २०२० मध्ये स्थापन झालेल्या ‘ग्लोबल शेपर्स कम्युनिटी’च्या बारामती हबमधून निवडून आलेल्या देवयानी पवार क्युरेटर आहेत.
देवयानी पवार या सप्टेंबर महिन्यात युरोपातील स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित तीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नेत्यांच्या समिटमध्ये उपस्थिती लावतील. या परिषदेमध्ये देवयानी पवार या 600 हून अधिक जागतिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांसोबत चर्चा करणार आहेत.
दरम्यान, याबाबत बोलताना देवयांनी पवार यांनी म्हंटलं आहे की, “मी ३० वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण भागाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करेन. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मी माझे अनुभव सांगणार आहे, जे मला ग्रामीण लोकांसोबत काम करताना आले आहेत. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…