Share

सदावर्तेंचा पाय खोलात, दोन आरोपींनी दिली धक्कादायक कबूली; म्हणाले, त्यांनीच सर्व काही केलं, हल्ल्यात आमचा..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करणार करणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

काही दिवसांपूर्वी पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता.

संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. तर आता गुणरत्न सदावर्ते हे पुणे पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच पुणे पोलिस त्यांना ताब्यात घेणार असल्याची चर्चानी जोर धरला आहे.

अशातच शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा आरोपींनी केला आहे.  पवारांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

या हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी याबाबत कबुली दिली आहे. ‘या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून, सर्व काही सदावर्तेंनी केले, अशी कबुली आरोपीने दिली आहे. त्यामुळे आता सदावर्तें यांच्या अडचणींमद्धे आणखीनच वाढ होणार असल्याच स्पष्ट दिसतं आहे.

दरम्यान,  ‘या हल्ला प्रकरणात आमचा काही रोल नाही, आम्ही आरोपी नाही, सगळ सदावर्ते यांनी केल्याचा खळबळजनक आरोप अभिषेक पाटील याने केला आहे. तसेच पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांचा एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now