sharad pawar : राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येतं आहे. शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादी – कॉंग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार राजकारणातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
पवार राजकारणात कधी, कोणता डाव टाकतील हे सांगता येत नाही हे अगदी खरं..! शरद पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडीत उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मात्र रुग्णालयात दाखल होण्यामागील कारण अद्याप समोर आलेल नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप यावर पवार कुटुंबातील कोणत्याच सदस्याची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माहिती दिली आहे. याबाबत पक्षाकडून एक पत्रक जारी करण्यात आल आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.
२ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं पत्रातून सांगण्यात आलं आहे. याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात परिसरात गर्दी करु नये असं आवाहनही करण्यात आलं आहे. आता डॉक्टरांनी माहिती दिल्यावरच पवारांच्या प्रकृतीबाबत आपल्या सविस्तर समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर