Share

गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरून परत टपरीवर चुना लावायला बसावं लागणार; रूपाली पाटील कडाडल्या

GULABRAV PATIL 1
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार हे चांगलेच चर्चेत आले आहेत. शिंदे गटातील आमदार सध्या जोमाने कामाला लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे करत आहेत. अशातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

नुकतच गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात महिलांसंबधी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्त्री रोग तज्ज्ञ कधीच महिलांचे हात-पाय पाहत नाही, असे म्हणत त्यांनी आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे. याचा विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

“मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील यांनीदेखील गुलाबराव पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
कुठल्या कार्यक्रमात काय बोलावे याचे भानदेखील या नेत्यांना नाही, अक्षरश: लाज वाटते, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. माध्यमांशी बोलताना रूपाली पाटील म्हणाल्या आहेत की, ‘गुलाबराव पाटील यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. कोणत्या कार्यक्रमात कुठलं उदाहरण देतोय, याचं भान मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जे हे गद्दार मंत्री आहेत यांना कुठलाही बुद्धीमत्तेचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचं कोणतंही एक धोरण जर तुम्ही दाखवलं, तर मी म्हणाल ते हारेल. गुलाबरावांनी जे वक्तव्य केलं आहे, की स्त्री रोग तज्ञांनी  हातपाय नसू दे बघत मात्र तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात परत मंत्रीपदावरून पानटपरीवर चुना लावायला बसावं लागणार आहे.”
दरम्यान, ‘मुख्यमंत्री शिंदेंना मला विचारायचं आहे की, अशी अडाणी लोक घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का? की जे सतत वाक्यातून महाराष्ट्राचा, महिलांचा अपमान होईल. असं सातत्याने करणाऱ्या लोकांपासून खरंच महाराष्ट्र वाचवला पाहिजे,’ असं रूपाली पाटील यांनी म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर पांड्यावर फिदा झाला रोहीत; खुल्या दिलाने कौतूक करत म्हणाला…
माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला; ‘पवार साहेबांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’
‘शरद पवार साहेबांनी अशी काही जादूची कांडी फिरवली होती की..,’ शिंदे गटाचे भरत गोगावले स्पष्टच बोलले
VIDEO: १० सेकंदात जमीनदोस्त केला ३२ मजली नोएडातील ट्वीन टॉवर, काय होतं कारण? वाचा
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now