Share

आमदार रोहित पवार आता ED च्या रडारवर; ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

rohit
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून ईडी राज्याच्या राजकारणात पुन्हा चांगलीच सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. विरोधकांच्या मागे ईडी हात धुवून लागली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेंही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ईडी चौकशीवर रोहित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, ”गेल्या अनेक वर्षांमध्ये खूपदा केंद्रीय यंत्रणांनी मला माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. सत्तेत येण्याच्या पाच वर्ष आधीही देखील सीआयडी आणि इतर संस्थांनी माझी चौकशी केली आहे. यामुळे जर मला बोलवलं, तर मी सहकार्य करेल.’

वाचा नेमकं प्रकरण काय?

ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा. 2006 ते 2012 या काळात रोहित पवार हे या कंपनीत संचालक होते. त्याचे वडील राजेंद्र पवार हे देखील या कंपनीत २००६ ते २००९ या काळात संचालक पदावर कार्यरत होते. या कंपनीबाबत आर्थिक घोटाळ्याची तक्रार ईडीकडे आली होती.

येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राकेश वाधवान आणि सारंग वाधवन यांचे या कंपनीशी अतिशय जवळचे संबंध असल्याचे सांगण्यात येते. याचबरोबर या प्रकरणी रोहित पवार कधीकाळी संचालक असलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now