सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अलीकडेच खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक हे बडे नेते देखील सध्या अटकेत आहेत. असं असतानाच लवकरच राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री भाजप नेते मोहीत कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. लवकरच संजय राऊतांबरोबर राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात दिसेल, असा खळबळजनक दावा करताना कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता.
आता याचाच धागा पकडत अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी कंबोज यांना लक्ष केलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवारांनी म्हंटलं आहे की, “ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…”
दरम्यान, पुढे रोहित पवार म्हणाले, “सत्तेत नसताना भाजप नेते किरीट सोमय्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पत्रकार परिषदा घेत आरोप करायचे, ट्विट करायचे. त्यातूनच सोमय्यांना मीडियाचं कव्हरेज मिळायचं. अशाच पद्धतीचं कव्हरेज मिळावं म्हणून कंबोज अशा पद्धतीचे ट्विट करीत असावेत”, असं पवारांनी म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे कंबोज यांच्या त्या सूचक ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादांनी तानाजी सावंतांना जागा दाखवली; विधानसभेत सावंतांच्या फजितीचीच चर्चा
पुन्हा नवा ट्विस्ट! भाच्याने केला खळबळजनक दावा; “…अन् तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”
Aditya Thackeray : भाजपमध्ये सुद्धा आहेत आदित्य ठाकरेंचे जबरा फॅन; थेट पुरावाच आला समोर
34 years of imprisonment : एक ट्विट पडले महागात; महिलेला ठोठावली तब्बल ३४ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, वाचा पुर्ण प्रकरण…