राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात असल्याने अखेर मागील 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला होता. ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तेथे शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी मंजुरी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. (ncp leader rajesh tope reaction on school reopening)
मात्र पालकांच्या संमतीनुसारच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. पहिली ते बारावी तसेच पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाला निर्णय घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिका स्तरावर आयुक्त तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesha tope) यांनी दिली आहे.
ते याबाबत जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.
दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी मोठं विधान केलंय. राज्यात सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय नाही, असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलीय. विजय वडेट्टीवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
त्यावेळी ते बोलत होते.स्थानिक प्रशासनानं परिस्थिती पाहून शाळेबाबतचा निर्णय घ्यावा, राज्यात सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय नाही. रुग्ण कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याचा विचार आहे. कोरोनाची स्थिती पाहून शाळेबाबत निर्णय घेऊ. राज्यातील रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या कमी झाल्यास निर्बंधही शिथिल होतील, अशी माहिती यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
हे फक्त शिवसैनिकच करू शकतो! जमीन विकून शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरेंचे मंदीर
PHOTO: शुटींगनंतर कतरिना घेत आहे विक्की कौशलची काळजी, बेडरुममधील फोटो झाला व्हायरल
सारा-विक्कीच्या चित्रपटाच्या शुटींगमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, घडले असे काही की..
‘या’ मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सने घातला होता धुमाकूळ, सीन्स पाहून सेन्सर बोर्डली हादरले होते