Share

नवाब मलिकांचे दाऊद गॅंगशी संबंध, त्यांनी दाऊद टोळीची मदत घेतल्याचे पुरावे; कोर्टाने स्पष्टच सांगितले

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते, याचे सकृतदर्शनी पुरावे दिसत आहेत,’ असं निरीक्षण मुंबईतल्या विशेष कोर्टानं नोंदवलं आहे. यामुळे आता नवाब मलिकांच्या अडचणींमद्धे आणखी वाढ होणार असल्याच स्पष्टच दिसतं आहे.

काही दिवसांपूर्वीच मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक होताच राजकारण तापलं. सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. तर अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिक यांना जबर झटका बसला आहे. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि टीचर ड्रायव्हर सलीम पटेल यांच्याबरोबर मलिक यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नवाब मलिक यांचे डी गॅंगशी संबंध होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. यामुळे आता नावब मलिक यांच्या अडचणींमद्धे आणखीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांच्यावर काही आरोप लगावले होते. यामध्ये ‘गोवावाला कंपाऊंडची सुमारे 3 एकर जमीन मिळवण्यासाठी मलिकांनी हसीना पारकर आणि सलीम पटेल यांच्याबरोबर एकत्र येऊन कट रचल्याचा गंभीर आरोप ईडीने केला होता. तर आता त्यालाच एक प्रकारे कोर्टाने पुष्टी दिल्याचे मानले जात आहे.

याचबरोबर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना म्हंटलं आहे की, ‘मलिक यांनी हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा कट रचला. त्यातूनच बेहिशेबी मालमत्ता जमवली असल्याने ते शिक्षेसाठी पात्र आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘रानबाजार’मधल्या बोल्ड दृश्यांमुळे तेजस्विनी ट्रोल; तेजस्विनीच्या आईने टीका करणाऱ्यांनाच झापले
‘तुझं नेमकं चाललय तरी काय?’; ‘रानबाजार’च्या बोल्ड भूमिकेनंतर ‘त्या’ फोटोवरून प्राजक्ता पुन्हा निशाण्यावर
संभाजीराजेंना कधीही भाजपचा प्रचार करायला लावला नाही; फडणवीसांनी शिवसेनेला सुनावले
केंद्रिय मंत्र्यांच्या पुतण्याचा भीषण अपघात, बाईकवर भलेमोठे झाड पडल्याने जाग्यावरच झाला मृत्यु

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now