Share

‘आपण कमरेखाली वार करायचा नाही’; जितेंद्र आव्हाडांनी सांगितल्या मुंडे साहेबांच्या आठवणी..

jitendra avhad

काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन होता.  भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला काल आठ वर्ष पूर्ण होत आहेत. काल गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर आले होते.

याचबरोबर नेतेमंडळींनी देखील गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमविणारा नेता अशी मुंडेची ओळख होती. याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहून गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांची पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. गोपिनाथ मुंडेंबद्दल प्रचंड राग असण्यामागचे कारण त्यांनी सांगितले आहे. याबाबत फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात, ‘गोपिनाथ मुंडे यांच्याशी माझी तशी राजकीय ओळख मी राजकारणात आल्यानंतर त्यांनी शरद पवार साहेबांविरुद्ध जेव्हा आरोपांच्या फेरी झाडायला सुरुवात केली तेव्हाच झाली.’

‘मी तसा त्यांच्याशी जवळून कधी बोललो देखील नव्हतो तसेच त्यांना कधी पाहिल देखील नव्हत. परंतु ते पवार साहेबांवरती टिका करत होते म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असायचा,’ असं आव्हाड यांनी म्हंटले आहे. तसेच पुढे पोस्टमध्ये त्यांनी गोपिनाथ मुंडेंबद्दलची एक आठवण देखील सांगितली आहे.

ते म्हणतात, ’29 मे 2014 रोजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्री पदाची शपथ घेतली. 1 तारखेला सकाळीच फोन वाजला. समोरुन आवाज आला अरे जितेंद्र अभिनंदन गोपिनाथ मुंडे बोलतोय, मंत्री झालास ना… अरे मी मंत्री झालो पण, तु माझ अभिनंदन नाही केलसं. मला लाजल्यासारख झालं. म्हणालो साहेब मी कुठे तुम्हांला फोन करु.’

त्यावर गोपिनाथ मुंडे म्हणाले तस काही नाही. चांगल काम कर संधी मिळाली आहे. आणि फोन ठेवला आणि दोनच दिवसांनी सकाळी फोन वाजला. तारीख 3 जून. गोपिनाथराव गेले हा निरोप आला. हे ऐकून सगळा प्रवास डोळ्यासमोर आला. पवार साहेबांवरती त्यांनी केलेले हल्ले, पवार साहेबांनी माझ्या हातातून घेतलेला कागद, आपण कमरेखाली वार करायचा नाही हा दिलेला संदेश, माझी केस, मुंडे साहेबांच्या मनाचा मोठेपणा, असं आव्हाड यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आव्हाड संतापले! म्हणाले, अक्षय कुमार हा मूर्ख माणूस, पुरंदरेंवरही केले ‘हे’ गंभीर आरोप
बृजभूषण यांना कोणी मॅनेज करु शकतं हे डोक्यातून काढून टाका; शरद पवारांचा मनसेला टोला
भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली; संजय राऊत स्पष्टच बोलले
‘रात्री १२ वाजता शहांना फोन करून म्हणालो दिल्लीतच बसलोय, अटक करा पण झुकूंगा नही साला’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now