गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. कालच्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे
काल झालेल्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला.
“मी जेव्हा उघडपणे बोलत होतो, तेव्हा हे काही बोलले नाहीत आणि आता जंत पाटील म्हणतात, राज ठाकरे उत्तर प्रदेशात कधी गेले होते. उत्तर प्रदेशाये यांना काय कौतुक? जंत पाटील माझे भाषण नीट ऐकत जा. मी म्हटलं होतं, ज्या बातम्या कानावर येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. मी जर तर बोलोलो होतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1513912766616113153?s=20&t=aw30HENQeFI14dkUoJZEzw
राज यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हणतात, २०१४ ला मोदींना पाठिंबा, २०१९ ला विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. तसंच वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा आणि विचारसरणी नथुराम गोडसेंची.’
पुढे पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा आणि नातं बाळासाहेबांचे विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरुप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असं म्हणत पाटील यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
दरम्यान, काल भाषणात जयंत पाटील यांना जंत पाटील तर आव्हाडांना थेट नागांची उपमाच देऊन राज ठाकरे जोरदार बरसले. ‘काय पण घ्याल, नागाने फना काढावा ना असा, उद्या परत काही तरी बोलेले, डसतो वगैरे, ये शेपटी पकडून फेकून देतो. वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल म्हणाले. आता तिथे वस्तारा कसा सापडणार, दाढी कुणी करतच नाही. मग वस्तारा कसा सापडणार. आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
‘केंद्र कोळसा देत नाही तर परदेशातून आणा’; महाराष्ट्रातल्या वीज टंचाईवरून दानवेंनी जबाबदारी झटकली
ये..शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो; राज ठाकरेंची जितेंद्र आव्हाडांना जाहीर धमकी
सदावर्तेंनी कोट्यवधी रुपये जमा केल्याच्या प्रकरणात खोत-पडळकरांचीही चौकशी होणार?
चंद्रकांत पाटलांना शिवसैनिकांनी मतदान केंद्रावरुन लावले पळवून; वाचा नेमकं काय घडलं..