eknath khadse : भाजपला रामराम ठोकून अलीकडेच एकनाथ खडसे राष्ट्रवादी – कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर खडसे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची देखील बातमी समोर आली होती. खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त देखील माध्यमांमध्ये झळकले होते.
असं असतानाच पुन्हा खडसे चर्चेत आले आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. याप्ररकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याच पोलीस दुर्लक्ष करत होते.
त्यामुळे खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर काही दूध पदार्थांची मोठी चोरी झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलंच गाजत आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय..?
हे प्रकरण जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातलं चोरीचं प्रकरणं आहे. खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैर व्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचं म्हटलं आहे.
असं असलं तरी देखील 16 तास ठिय्या मांडूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असून जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा खडसे यांनी आता पोलिसांना दिला.
विशेष बाब म्हणजे, गुन्हा दाखल होत नसल्याने खडसेंनी अधिकाऱ्याला चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली आहे. तर दुसरीकडे, खडसे यांची प्रकृती बिघडली असल्याच देखील समजत आहे. प्रकृती बिघडल्याने खडसेंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.